Download App

VIDEO : ‘आमच्याकडे बहुमत, कामकाज रेटून नेणार…’ अजितदादांचं विरोधकांना प्रत्युत्तर

Ajit Pawar On Budget session 2025 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित (Budget session 2025) चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार उपस्थित होते. तर विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अजित पवार यांनी (Ajit Pawar) विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलंय.

रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे शिंदेंच्या आमदाराचे कार्यकर्ते, रोहिणी खडसेंचा दावा

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, काम चांगलं असेल तर जनता पुन्हा निवडून देते. त्याच दिशेने आमचं काम सुरू आहे. सरकार चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर जनतेसमोर जे प्रश्न (Mahayuti Politics) आहेत, त्यासंदर्भात आम्हाला विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करायची होती. पण त्यांनी भलंमोठं पत्र आज सरकारला दिलंय. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री महोदय भाषण करतील. आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे. आमच्याकडे बहुमत आहे, समोर पन्नासच आमदार विरोधी पक्षाचे आहेत. त्यामुळे बहुमताच्या जोरावर निर्णय रेटायचे, असं महायुती करत नाही.

भले एमआयएमध्ये जावू, पण आता सुरेश धसांना सुट्टी नाही…, बाळासाहेब आजबेंचा इशारा

महायुतीचं सरकार आणि त्यांची टीम प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीत आहे. पण केवळ आरोप करायचे, असं असेल तर घटनेतील तथ्य बघून त्यांना उत्तरं दिली जातील. काही बिलं आली तर ती मांडली जाणार आहेत, सूचना देखील विचारात घेतल्या जातील, असं अजित पवार म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तरं दिलंय. ते म्हणाले की, महायुतीचे सरकार चांगलं चालवावं म्हणून सर्वांचा प्रयत्न आहे. विरोधकांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची आमची तयारी आहे. कामकाज रेटायचं म्हणून काम अजिबात करणार नाही. त्यामुळे चार आठवड्याचे अधिवेशन असणार आहे, असं देखील अजित पवार म्हणाले आहेत. सोबतच विरोधकांनी देखील नुसते आरोप न करता, कामकाजात भाग घ्यावा, अशी अपेक्षा देखील अजित पवारांनी बोलून दाखवली आहे.

 

follow us