Download App

मनोज जरांगेंनी पवारांच्या घरासमोर उपोषण करावे; सदाभाऊ खोतांचे जरांगेंना थेट चँलेज

जरांगे पाटील यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पिच्छा सोडा आणि बारामतीच्या दिशेने मोर्चा वळववा.

  • Written By: Last Updated:

Sadabhau Khot On Manoj Jarange: भाजपकडून विधानपरिषदेवर वर्णी लागलेले सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आता थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना थेट आव्हान दिले आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा (BJP) पिच्छा सोडून तुम्ही बारामतीच्या दिशेने मोर्चा वळून शरद पवारांच्या घरासमोर उपोषण आंदोलन करावे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

तुम्ही घटना बदलणार आहे का ? तुम्ही सुप्रीम कोर्ट आहे का? सदाभाऊ खोतांनी जरांगेंना अंगावर घेतले !

शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर महाविकास आघाडीला मतदान झाले आहे. शरद पवार, काँग्रेसचे खासदार निवडून आलेत. त्यांनी आता लेखी लिहून द्यावे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्यासाठी आम्ही पाठिंबा देत आहे. प्रत्येक काँग्रेस, राष्ट्रवादीच्या खासदारांनी पत्र लिहून दिले पाहिजे की संपूर्ण मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करत आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीला शरद पवार दांडी मारतात. हा प्रश्न मिटला नाही पाहिजे, हा प्रश्न चिघळत राहिल्याने आपल्याला लोकसभा जिंकता आली आहे. आता विधानसभा जिंकता येते का ? तेच काम चालले आहे.

मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद; काय योजना राबविणार ?

मराठा समाजाला हात जोडून सांगतो की पहिल्यांदा ओबीसीचे दाखले मिळालेले आहेत. दाखले काढून घेऊन लाभ घ्या. दुसरीकडे दहा टक्के आरक्षण टिकूया अजून काही मिळतो का बघू. आता राजकीय लढाया झाल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून शरद पवार यांना विधानसभा निवडून भाकरी भाजवून घ्यायची आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे छातीठोकपणे लिहून दिले पाहिजे. तसे त्यांनी जाहीर करावे, असे आवाहन खोत यांनी केले.

जरांगे पाटील यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पिच्छा सोडा आणि बारामतीच्या दिशेने मोर्चा वळववा. मग आम्हाला समजेल की तुम्ही सगळ्यांकडे जावून हे मागत आहे. जरांगे यांनी बारामतीला शरद पवार यांच्या घरासमोर उपोषणला जावून बसावे. ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास पाठिंबा आहे, असे त्यांच्याकडून लिहून घ्या. त्याशिवाय मी हलणार आहे. जरांगे यांनी ठाण मांडून उपोषण केल्यास आम्ही त्यांच्या उपोषणाला जावू. ते बारामतीला नाही गेले तर राजकारण सुरू असल्याचे समजून घ्या, असा टोलाही खोतांनी लगावला आहे.

follow us