Manoj Jarange News : समाजाला सर्व काही मिळून दिल्यानंतर आमच्या सामाजिक खुर्चीवर बसणार पण राजकारणाच्या खुर्चीवर बसणार नसल्याचं मोठं विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलं आहे. दरम्यान, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी तुर्तास आंदोलन स्थगित केलं आहे. मात्र, अध्यादेशानंतर काही दगाफटका झाल्यास येत्या 10 फेब्रुवारीला पुन्हा आंदोलनाला बसणार असल्याचा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला आहे. मराठा महोत्सवाच्या उद्घाटनादरम्यान ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे.
Talathi Bharati : भावी तलाठ्यांसाठी खुशखबर, ‘या’ तारखेला मिळणार नियुक्तीपत्र
मनोज जरांगे म्हणाले, जुनं काहीतरी लिहुन ठेवलंले आहे, त्यामुळेच नवीन नोंदी सापडल्या आहेत. पूर्वीच्या नोंदी नव्याने सापडल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान, अनेक मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे मागे घेणार असल्याचं लेखी आश्वासन राज्य सरकारकडून आम्हाला देण्यात आलं आहे. त्यामुळे सरकार पुढील प्रक्रिया कधी करणार हे पाहु, असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.
थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘फाइटर’; कुठे आणि कधी पाहाल?
तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही मनोज जरांगे यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, भुजबळ गप्प बसत नाही. बावचाळल्यावाणी काहीही बोलतो, मी कोणाच्या वाट जात नाही. मी सर्व जाती-धर्मांना मानतो. कोणालाही माझ्याकडून वाईट शब्द नाही पण छगन भुजबळला सुट्टी नाहीच, छगन भुजबळ हा गरीबांचा, ओबीसींचा, मराठ्यांचाही होऊ शकत नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे.
live in मध्ये राहणाऱ्यांना नोंदणी अनिवार्य, अन्यथा…; भाजप सरकारचा जोडप्यांना घाम फोडणारा कायदा
माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांना राजकारणात येणार का? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले, मी कुठं बसत नाही. मी सामान्य कुटुंबात आलो आहे. सर्वसामान्यांसाठी काम करायचं आहे. समाजाने नियम काढले आहेत, सर्वांच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे, मी अजून व्यासपीठावर खुर्चीवर कधी बसलेलो नाही, नंतर एकदा अंमलबजावणी झाली, समाजाला सगळं काही दिल्यानंतर आमच्या सामाजिक खुर्चीवर बसेन ती नको आम्हाला, असं उत्तर देत मनोज जरांगे यांनी राजकारणात येणार नसल्याचं म्हटलं आहे.