Talathi Bharati : भावी तलाठ्यांसाठी खुशखबर, ‘या’ तारखेला मिळणार नियुक्तीपत्र

  • Written By: Published:
Talathi Bharati : भावी तलाठ्यांसाठी खुशखबर, ‘या’ तारखेला मिळणार नियुक्तीपत्र

Talathi Bharati News : तलाठी परीक्षेची (Talathi Bharati) गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठवडाभरता जिल्हास्तरावरील निवड यादी जाहीर करण्यात आल्या होती. ही निवड आणि प्रतीक्षा यादी गेल्या महिन्यात भूमिअभिलेख विभागाने (Land Records Department) जाहीर केली होती. त्यानुसार निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर संबंधित उमेदवारांना तलाठी पदासाठी नियुक्तीपत्रांचे (appointment letters) वाटप करण्यात येणार आहे.

स्मॉल कॅप निर्देशांकानं गाठला ऐतिहासिक उच्चांक; गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 2.82 लाख कोटींची वाढ 

तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आल्यानंतर पुढील टप्पा म्हणून २३ जानेवारी रोजी रात्री उशिरा राज्यातील २३ जिल्ह्यांमधील निवड व प्रतीक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली. या याद्या संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समितीने तयार केल्या आहेत. उर्वरित 13 आदिवासीबहुल जिल्ह्यांतील निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.

Hrithik Roshan War: हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’ संदर्भात चाहत्यांना दिली गूडन्यूज, म्हणाला… 

दरम्या, प्रभारी अपर जमाबंदी आयुक्त सरिता नरके म्हणाल्या, सध्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, कागदपत्रांची पडताळणी, चारित्र्य पडताळणी ही प्रक्रिया सुरू आहे. कागदपत्र पडताळणीत उभे आणि समांतर आरक्षण असे दोन भाग केले आहेत. त्यासाठी विविध प्रकारची कागदपत्रे आहेत, ती कागदपत्रे तपासली जात आहेत. परीक्षेला जाताना उमेदवारांनी जो अंगठा यंत्रावर दिला आहे, निवड झालेल्या उमेदवाराचा आणखी एकदा अंगठा घेऊन परीक्षेला बसलेला आणि निवड झालेला उमेदवार तोच आहे हे तपासण्यात येणरा आहे. ही प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल. जिल्हा निवड तपासणी समितीमार्फत ही प्रक्रिया केली जात आहे.

नरके यांनी पुढं बोलतांना या सांगितले की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेचे वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 फेब्रुवारीनंतर नियुक्तीपत्रे मिळतील. ज्या जिल्ह्यांमध्ये सुमारे 100-125 उमेदवारांची तपासणी केली जाणार आहे, तेथे दहा ते बारा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सुमारे दीडशे ते दोनशे उमेदवार असलेल्या जिल्ह्यात आणखी थोडा वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त नरके यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या