तलाठी भरती परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर, कधीपर्यंत मिळणार नियुक्तीपत्रे?

  • Written By: Published:
तलाठी भरती परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर, कधीपर्यंत मिळणार नियुक्तीपत्रे?

Talathi Recruitment Result : राज्यात नुकत्याच झालेल्या तलाठी पदाच्या परीक्षेच्या (Talathi Exam) नमुना उत्तरपत्रिका (Sample Answer Sheet) जारी करण्यात आल्या. येत्या रविवारपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर आठवडाभरात हरकती गोळा करून 31 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा उत्तरपत्रिका अंतिम करण्यात येणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्यांचे गुण कळू शकतील. मात्र, अंतिम गुणवत्ता यादी 15 डिसेंबरपर्यंत जाहीर केली जाईल. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात येणार आहे.

राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यावर वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, माझ्या बोलण्याचा….’ 

बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा 14 सप्टेंबरला संपली. राज्यात 4 हजार 466 तलाठी पदांसाठी 8 लाख 56 हजार जणांनी परीक्षा दिली होती. मोठ्या संख्येने अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यात आणि दिवसातील तीन सत्रात घेण्यात आली होती. त्यानुसार, पहिला टप्पा 17 ते 22 ऑगस्ट, दुसरा टप्पा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर आणि चौथा टप्पा 4 ते 14 सप्टेंबर असे तीन टप्पे केले होते. त्यानंतर प्रत्येक टप्प्यात घेतलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. त्यावर उमेदवारांना उत्तरपत्रिकेबाबत हरकती घेण्याची संधी दिली आहे.

16 ऑक्टोबरपर्यंत सर्व हरकती एकत्रित करण्यात येणार आहेत. हरकती नोंदविण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. संकलित केलेल्या हरकती प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या गटाकडे पाठवल्या जातील. यामध्ये दुरुस्तीसाठी 31 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध होणार आहे, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्यांचे गुण कळू शकतील. मात्र, अंतिम गुणवत्ता यादी 15 डिसेंबरपर्यंत जाहीर केली जाईल. असे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी सांगितले.

जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र व अपात्र उमेदवारांच्या गुणांसह जिल्हानिहाय पात्रता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ही यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी 15 डिसेंबरपर्यंत जाहीर होईल. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पुढील एक महिन्याचा अवधी दिला जाईल. त्यानंतर 26 जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निवड झालेल्या उमेदवारांना राज्यपालांच्या हस्ते नियुक्तीपत्रे दिली जातील, असे आनंद रायते यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube