Download App

मोठी बातमी! मनोज जरांगेंची माघार, उपोषण मागे; पुन्हा राज्यभर दौरा

Manoj Jarnage Patil : आक्रमक भूमिका घेतलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अखेर रस घेऊन आमरण उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान, मागील 16 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण जरांगेंनी मागे घेत रुग्णालयात उपचार घेऊन पुन्हा राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा केलीयं.

झनक आणि अनिरुद्ध यांच्या विवाहाचे सत्य अखेर सर्वांसमोर; ‘या’ व्यक्तीने केला खुलासा

अंतरवली ते मुंबई अशी पदयात्रा काढल्यानंतर मुंबईच्या वेशीवरच असतानाच राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी मनोज जरांगे यांच्या मागणीनूसार राज्य सरकारकडून अध्यादेश काढण्यात आला होता. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आंदोलन स्थगित केलं होतं. त्यानंतर सगेसोयरे मागणीच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसल्याचं दिसून आलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप कराल तर; जरांगे व विरोधकांना शेलारांचा थेट इशारा

10 फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणादरम्यान, मध्यंतरीच्या काळात जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडून अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. यामध्ये अजय बारस्कर महाराज, संगिता वानखेडे यांनी पत्रकार परिषदा घेत मनोज जरांगे यांच्यामागे राजकीय शक्तीचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावल्याचं दिसून आलं होतं.

मनोज जरांगे यांच्यावर आरोपांचं सत्र सुरुच असताना काल मनोज जरांगे पत्रकार परिषदेत आक्रमक झाल्याचं दिसून आले होते. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी स्टेजवरुनच माईक हातात घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत गंभीर स्वरुपाचे आरोप केल्याचं दिसून आले होते. अखेर स्टेजवरुन खाली उतरुन जरांगे यांनी मी सागर बंगल्यावर येतोयं देवेंद्र फडणवीसांना माझा बळी घ्यायचायं मला गोळ्या घाला इकडे उपोषण करुन मरण्यापेक्षा सागर बंगल्यावर मरेन, असं विधान करीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर विधाने केल्याचं दिसून आलं होते.

मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांना समाजबांधवांकडून विनंत्या, विनवण्या करण्यात आल्या. मात्र मनोज जरांगे सागर बंगल्यावर जाण्यावरच ठाम असल्याचे दिसून आले होते. अखेर जरांगे यांनी अंतरवलीपासून एकटेच पायी दौरा करत भांबेरी गावात मुक्काम केला. त्यानंतर समाजबांधवांवर कारवाई होत असल्याने अखेर मनोज जरांगे यांनी पुन्हा अंतरवलीची वाट धरत आज दुपारच्या सुमारास अखेर उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पुन्हा राज्यभर दौरा करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

follow us