Download App

फडणवीस…गोळ्या घाल अन् बळी घे मी तयार; जरांगेंची स्वारी ‘सागर’ बंगल्याकडे

Image Credit: Letsupp

Manoj Jarange Patil On Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीस मला गोळ्या घाल बळी घे मी मरायला तयार असल्याचं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ‘सागर’ बंगल्याकडे जाण्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे. आंदोलनस्थळी गोंधळ झाल्यानंतर मनोज जरांगे गाडीत बसले असून मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत. याचदरम्यान, आंदोलकांकडून त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र, मनोज जरांगेंनी गाडी अडवू नका असं आवाहन केलं आहे. दरम्यान, गाडीत बसल्यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

Pakistan : घोषणा नाही, कारणही नाही तरीही ‘एक्स’ ठप्प; पाकिस्तानात सात दिवसांपासून चाललंय काय?

मनोज जरांगे म्हणाले, राज्यभरात मराठा समाजबांधवांकडून शांततेत आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीसला असं वाटतंय की, मी मराठा समाजाला मागील 75 वर्षांत मोठं केलं आहे.

Akash Deep : वडील अन् भावाला गमावलं, गरिबीमुळे क्रिकेटही सोडलं, आता पदार्पणातच ठरला ‘हुकूमी एक्का’

मराठ्यांना 10 टक्के आरक्षण दिलं तरीही ते ओबीसीतून मागत असून सगेसोयरेची अंमलबजावणी करायचं नसल्याचं फडणवीसांकडून सांगण्यात आलं असून मनोज जरांगेला रात्रीच्या गोळ्या घालून मारा, असं सांगितलं असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

Ravichandran Ashwin : अश्विनचा पराक्रम! इंग्लंडविरुद्ध 100 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज

दरम्यान, मला गोळ्या घातल्या तरी बेहत्तर मी फडणवीसांच्या दारात जाणारच असल्याचा पवित्राच मनोज जरांगे यांनी घेतला आहे. यावेळी आंदोलकांकडून समजावण्याचा प्रतत्न केला जात आहे. गाडीत बसून जरांगे सागर बंगल्याकडे रवाना होत आहेत. याचवेळी आंदोलकांकडून अंतरवली सराटीत जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.

एकतर गुलाल घेऊन येतो नाहीतर…
मराठ्यांनो गाडी अडवू नका,मराठ्यांना एकच विनंती, गाडी अडवू नका मी एकतर गुलाल घेऊन येतो नाहीतर फडणवीस माझा गोळ्या घालून बळी घे मी मरायला तयार आहे. माझ्याविरोधात षडयंत्र करतो मराठ्यांचे आमदार, छगन भुजबळ माझ्या अंगावर घालतो. माझा काटा काढायचा म्हणतोय डॉक्टर पोलिसांच्या हातांनी मला मारायचं म्हणतोयं. समाजबांधवांनी माझ्या गाडीला अडवं येऊ नये, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

follow us

वेब स्टोरीज