उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि सरकारने चुकीच्या ठिकाणी हात घातला असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj jarange patil) फडणवीस यांच्या एका क्लिपचा उल्लेख करीत हल्लाबोल केला आहे. दरम्यान, मराठा आंदोलन मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचारादरम्यान, घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘भाजपकडून देशाचा अन् राज्याचा लिलाव’; अर्थसंकल्पावरुन नाना पटोलेंची जहरी टीका
मनोज जरांगे म्हणाले, हा खूप अवघड कार्यक्रम आहे. सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांनी चुकीच्या ठिकाणी हात घातला आहे. मी मागे सरकणारा नाही ते भिनारे काही अडचणी असतील म्हणून भीत असतील. मी एक क्लिप ऐकली, त्या क्लिपमध्ये बाळासाहेब थोरात बोलतात आणि त्याला फडणवीस उत्तर देत आहेत. क्लिपमध्ये फडणवीस म्हणतात, असं बोलल्यावर कसं जमणार आहे. तुमच्याबद्दल कोणी असं बोललं, तर सर्वात आधी देवेंद्र फडणवीस तुमच्या बाजून उभा राहीन, असं म्हणत देवेंद्र फडणवीसारखा चतुर माणून बाजू मारुन नेत असल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली आहे.
Rohit Pawar यांना डावलून शिंदेंना निमंत्रण; एमआयडीसीच्या बैठकीवरून पुन्हा संघर्ष पेटणार
तसेच फडणवीस एक चतुर माणूस असून त्यांची बाजू मारुन नेऊपर्यंत ते सर्वांचा वापर करत आहेत. जसा त्यांनी आजपर्यंत मराठ्यांचा वापर केला आहे तसाच. सरकारने शहाणे व्हावं, तुम्ही चुकीच्या ठिकाणी हात घातला. मी मरण पत्करण पण समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे लक्षात ठेवा, या शब्दांत मनोज जरांगे यांनी इशाराच दिला आहे.
देशातील सर्वात वयोवृद्ध खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचे निधन : 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वडेट्टीवारांवरही टीका…
राज्याच्या विऱोधी पक्षनेत्याला कोणतीही जात नसते. आत्ताचे विरोधीपक्षनेते जात बघत आहेत. ते त्यांचा विरोधी पक्षनेत्याचा शिक्का बघतात. वैचारिक मतभेद असतील पण जिथं अन्याय वाटला तिथं न्याय मंदिराने आवाज उठवला पाहिजे. दडपशाहीविरोधात सगळेचं शांत आहेत याचा अर्थ ते सरकारच्या बाजूने असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.