देशातील सर्वात वयोवृद्ध खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचे निधन : 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
लखनऊ : देशातील सर्वात वयोवृद्ध खासदार शफीकुर रहमान बर्के (Shafiqur Rahman Barq) यांचे आज (27 फेब्रुवारी) निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. बर्क 2019 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या तिकीटावर संभल मतदारसंघातून निवडून आले होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना किडनीच्या संसर्गाने त्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. अखेर आज मुरादाबादमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शफीकुर रहमान बर्क यांचा जन्म 11 जुलै 1930 रोजी झाला होता. चौधरी चरणसिंग यांच्यासोबत त्यांनी राजकारणाची बाराखडी गिरवली. बाबरी मशीद कृती समितीचे ते निमंत्रकही होते. मुस्लीम समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांना ओळखले जात होते. समाजवादी पक्षाच्या स्थापनेदरम्यान मुलायमसिंह यादव यांच्यासोबतही त्यांनी काम केले होते. त्यामुळे त्यांना समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्यही म्हटले जाते. (Shafiqur Rahman Barq, the oldest Member of Parliament of the country, passed away)
अखिलेश यादवांना सर्वात मोठा धक्का : राज्यसभा मतदानाला काही मिनिटे बाकी असतानाच मुख्य प्रतोदांचा राजीनामा
लोकसभा निवडणुकीत पाच वेळा विजयी
सध्या संभलचे खासदार असलेल्या बर्के यांनी पाच वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती. यात 1996, 1998 आणि 2004 मध्ये मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून तर 2009 आणि 2019 मध्ये संभल मतदारसंघातून विजयी झाले. 1999 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवही स्वीकारावा लागला होता. 2019 मध्ये संभल मतदारसंघातून तर केवळ 5174 मतांच्या फरकाने ते पराभूत झाले.
संभल मतदारसंघातून चार वेळा आमदार :
याशिवाय शफीकुर रहमान बर्के हे संभल मतदारसंघातून चारवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1974 ते 1977, 1977 ते 1980, 1985 ते 1989 आणि त्यानंतर 1991 पर्यंत ते आमदार होते. याशिवाय ते एकदा उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते. बर्क यांचा वारसा त्यांचा नातू पुढे चालवत आहे. त्यांचा नातू झियाउर रहमान बुर्के यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत मुरादाबादच्या कुंडरकी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. शफीकुर रहमान बर्के यांनी आपल्या नातवाला विजयी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती.
Rajya Sabha : राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान; सपा-काँग्रेससह विरोधकांची वाढली ‘धाकधूक’
पंतप्रधान मोदींनीही केले होते बर्क यांचे कौतुक :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा बर्क यांचे कौतुक केले होते. 2023 मध्ये नवीन लोकसभेतील भाषणादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी बर्क यांच्या सभागृहातील निष्ठेबद्दल त्यांचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की 93 वर्षांचे असूनही डॉ. शफीकुर रहमान बर्के या सभागृहात बसले आहेत. सदनाप्रती अशी निष्ठा असायला हवी, असे ते म्हणाले होते.