‘मला संपवण्याचा डाव’ हे बिनबुडाचं अन् धादांत खोटं; फडणवीसांनी आरोप फेटाळले

Devemdra Fadnvis On Manoj Jarange : मनोज जरांगेंनी (Manoj Jarnage) केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि धादांत खोट असल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केला आहे. मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट नाव घेत फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारची […]

Manoj Jarange Patil On Devendra Fadnvis

Devemdra Fadnvis On Manoj Jarange : मनोज जरांगेंनी (Manoj Jarnage) केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि धादांत खोट असल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केला आहे. मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट नाव घेत फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.

फडणवीस…गोळ्या घाल अन् बळी घे मी तयार; जरांगेंची स्वारी ‘सागर’ बंगल्याकडे

देवेंद्र फ़डणवीस म्हणाले, ‘सागर’ हा सरकारी बंगला असून सरकारी कामानिमित्त कोणीही कधीही बंगल्यावर येऊ शकतं. मनोज जरांगे पाटील कुठल्या निराशेत बोलत आहेत, कोणती सहानूभूती त्यांना घ्यायची याबाबत माहित नाही. पण मनोज जरांगे जे बोलत आहेत ते धादांत खोट असून बिनबुडाचं आहे, हे मनोज जरांगेंनाही माहित असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

तसेच मराठा समाजासाठी मी काय केलं हे सर्वांना माहित आहे. सारथी महामंडळाची सुरुवात मी केलीयं. त्यानंतर योजनांमध्ये वाढ मुख्यमंत्री शिंदेंनी केलीयं. मी मराठा आरक्षण हायकोर्टात टिकवलं, त्यानंतर मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयातही ते टिकवलं होतं. मात्र, मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर जे कोणी मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवू शकले नाहीत, त्यामुळे
कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज अशा गोष्टीवर विश्वास ठेवेलं असं वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

भाजपला ‘अब की बार 370 पार ‘अशक्य’, काँग्रेसचं ‘शतक’ हुकणार; प्रशांत किशोर यांचं भाकित काय?

पवार-ठाकरेंवर रोख…
जी स्क्रिप्ट आत्तापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, शरद पवार बोलत होते तेच विषय जरांगेंनी का मांडावे? असा माझा प्रश्न असून यामागे काय आहे काय नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याची कल्पना आम्हाला आहे तेही बाहेर येईलच. कायदा सुव्यवस्थेच पालन होणार नसेल तर पोलिसांना कारवाई करावीच लागेल, या शब्दांतही फडणवीस यांनी सूचक इशाराच मनोज जरांगे यांना दिला आहे.

माध्यमांनाच केला प्रतिसवाल…
मनोज जरांगे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत थेट फडणवीस यांच्यावर गंभीर केले होते. देवेंद्र फडणवीस यांचा मला संपवण्याचा कट असून डॉक्टर किंवा पोलिसांच्या माध्यमातून त्यांचा मला संपवण्याचा कट आहे. त्यापेक्षा मीच सागर बंगल्यावर येतो, मला गोळ्या घाला असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला होता. त्यावर प्रश्न विचारताच फडणीस यांनी माध्यमांना सवाल करीत तुमचा तरी त्यावर विश्वास आहे का? माध्यमांनी असे प्रश्न विचारणं हे आश्चर्य असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Exit mobile version