Download App

‘राज्यात रेकार्डिंग व्हायरल करणार’; मनोज जरांगेंनी महाजनांना भरला दम

Manoj Jarange Patil On Girish Mahajan : वेगळी विधाने करु नका, नाहीतर सगळ्या रेकॉर्डिंग राज्यात व्हायरल करणार असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांना(Girish Mahajan) दम भरला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गिरीश महाजनांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचं भाष्य केलं. त्यावरुन मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला आहे. जरांगे पाटील यांनी जळगावातून माध्यमांशी संवाद साधला आहे.

नौदलाच्या गणवेशावर आता छत्रपती शिवरायांची राजमुद्रा : PM मोदींची मोठी घोषणा

मनोज जरांगे पाटील म्हणाले, गिरीश महाजनांना विचार करावा. ते आंतरवलीत येऊन म्हटले होते की, कायदा पारित करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. तेव्हा 4 दिवसांचा वेळ होता. आम्हाला एक महिन्याचा वेळ मागितला, त्यानंतर आम्ही कायदा पारित करु असं महाजन म्हणाले होते. त्यांनी वेगळे विधाने करु नये आणि मराठ्यांना नडू नये त्यांचे सगळे रेकॉर्डिंग आहेत सर्व राज्यात व्हायरल करु, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

‘EVM च्या जनदेशाचा स्वीकार करतोय पण…’; 4 राज्यांच्या निकालावर राऊतांच भाजपला चॅलेंज

सरकारमधल्या वरिष्ठ नेत्यांने अशी भरकटल्यासारखं वक्तव्य करु नये. महाजनांनी शब्दप्रयोग चांगला करावा त्यांना आम्ही मानसन्मान दिलायं. आधी एक महिन्याचा नंतर 40 दिवसांचा आता दोन महिन्यांचा वेळ दिला आहे, त्यांनी असं बोलून फडणवीसांचं नाव खराब करु नये, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Rajasthan Election : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराने भाजप-कॉंग्रेसला दिली तगडी फाईट

गिरीश महाजन म्हणाले, राज्यात ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना प्रमाणपत्र वाटप झाले आहे. मनोज जरांगे त्यांची मागणी मांडत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला त्यांना दुखवायचं नाही. ओबीसीचं आरक्षण काढता येणार नाही. मराठ्यांना घाई गडबडीत आरक्षण देऊन त्यांना फसवणूक करायची असं आता होता कामा नये. मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नाही. हे मनोज जरांगे यांच्या जवळच्या लोकांना देखील माहिती आहे. समाजातील अभ्यासक, प्राध्यापक, कुलगुरु विचारवत यांनी सर्वांनी विचार करून ठरविले आहे की सरसकट आरक्षण देता येणार नाही. एससीबीसी कोर्टातून मिळेल. त्यातूनच न्याय मिळेल, कोर्टाने आधी मराठ्यांना आरक्षण नाकारले आहे. त्यावर फेरयाचिका केली आहे. त्यातून समाजाला नक्की न्याय मिळेल, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी लावून धरली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण शक्य नसल्याचं विधान गिरीश महाजन यांनी केलं. त्यावरुन आता जरांगे-महाजनांमध्ये शाब्दिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us