Manoj Jarange Patil : छगन भुजबळ बोगस आरक्षण खाणाऱ्या समितीचा मुकादम असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (manoj jarange patil) यांनी आज सोलापुरच्या सभेत कोणालाही सोडलं नसल्याचं पाहायला मिळालंय. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांची शांतता रॅलीचं राज्यभरात आयोजन केलं जात आहे. जरांगे यांची सोलापुरात शांतता रॅली पार पडली. या सभेतून मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह छगन भुजबळांवर जोरदार निशाणा साधलायं.
शरद पवार आता शिवनेरीवरून तुतारी फुंकणार; जयंत पाटलांनी केली शिवस्वराज्य यात्रेची घोषणा
मनोज जरांगे म्हणाले, छगन भुजबळ हा साऱ्या दुनियेचा एडा आहे, त्याला आता राज्य सरकारने एका समितीचं अध्यक्ष केलं आहे, तो घोटाळ्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष असून घोटाळे कसे करायचे हे छगन भुजबळला चांगला माहिती आहे. बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ हा मुकादम असल्याची जहरी टीका मनोज जरांगे यांनी केलीयं.
तसेच छगन भुजबळ यांचा महाराष्ट्र सदन घोटाळा, भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचा कथित आदर्श घोटाळा तर अजित पवार यांच्या 70 हजार कोटींचा उल्लेख करीत हे सगळे घोटाळे करणारे देवेंद्र फडणवीस यांच्या टोळीत असून छगन भुजबळ यांच्या टोळीचा मुकादम असल्याचंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.
Vinesh Phogat प्रकरणाचे संसदेत पडसाद; विरोधकांचा लोकसभेत जोरदार गदारोळ
घोटाळे करणारे, दंगली करणारे, पाकीट मारणारे, टाके टाकणारे भुरट्यांपासून सगळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. बोगस आरक्षण खाणारे सगळेच देवेंद्र फडणवीसांकडे असून मी यांचा टप्प्यात आला की मी कार्यक्रम करीत असतो, ज्यांची गिनती मराठ्यांच्या डायरीत नाही त्यांचं नाव मी घेत नाही, असं म्हणत मनोज जरांगे यांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केलीयं.
देवेंद्र फडणवीस आता माझ्याविरोधात तिसरी टोळी करीत आहेत. भाजपचा एक नेता जो माझ्याजवळ उभा केल्यास माझ्या गुडघ्याजवळ लागेल, त्याला सांगा की आता मराठे मुंबईत आले तर तुम्हाला मुंबई सोडून जावं लागणार असल्याचा थेट इशारा मनोज जरांगे यांनी भाजपचे नेते नारायण राणे यांना दिलायं.
सुवर्णपदकाची चाहूल! नीरज चोप्राची सर्वोत्तम कामगिरी; भालाफेकच्या अंतिम फेरीत दाखल…
देवेंद्र फडणवीस यांना आता मेळ लागत नाहीये. ईडब्लूएस फडणवीसांनी रद्द केलंय. आमची 10 टक्क्याची मागणी नव्हती तरीही मराठा समाजावर हे आरक्षण लादलं गेलं आहे. तुम्हाला आता मेळ लागत नाहीये, तुम्ही जे दुपारी घ्यायचं ते संध्याकाळी आणि संध्याकाळी घ्यायचं ते दुपारी घेत असल्याने असं होत असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, आता मराठा समाजाने कोणत्याही नेत्याचा, पक्षाचा उदोउदो करु नका, पुढील दहा वर्षांत आपले पोरं सुशिक्षित झालेले दिसतील. नाही तर पुढील दहा वर्षांत अनेकांच्या आत्महत्या झालेल्या दिसतील, आपल्या लेकरांचं वाटोळ होईल. आता तुम्ही तुमच्या जातीसाठी आणि पोरांसाठी जातीला मोठं करा पक्षाला नाही, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजबांधवांना केलंय.