Manoj Jarange On Devendra Fadnvis : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर गंभीर स्वरुपात आरोप करण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीसांकडूनच (Devendra Fadnvis) हा मला संपवण्याचा डाव असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे अचनाकपणे देवेंद्र फडणवीसांवर धावले आहेत. उपोषणस्थळीच मराठा समाजबांधवांना झुगारुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्याकडे निघाले आहेत. मात्र, समाजबांधवांकडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसून येत आहे. अंतरवली सराटीत उपोषणस्थळी गोंधळ सुरु असल्याची परिस्थिती आहे.
भाजप 100 उमेदवारांची पहिली यादी ‘या’ दिवशी करणार जाहीर, मोदीं-शाहांच्या नावाचा असणार समावेश
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘राज्य सरकार एकनाथ शिंदे आणि अजित पवार नाही तर देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत. मला संपवण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनीच रचलं आहे. त्यांच्याच माध्यमातून वेगवेगळी लोकं पुढे करून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. मी आता थेट सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार आहे’, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.
विमानतळावर सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्याला नसीरुद्दीन शाहने ढकललं, व्हिडिओ होतोय व्हायरल
जरांगे पाटील पुढे म्हणाले, ‘मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवेंद्र फडणवीस माझा एन्काऊंटर करण्याच्या विचारात आहेत. आज मराठा समाजाचा दरारा निर्माण झाला आहे. परंतु, मराठ्यांच्या हातूनच संपवण्याचे काम केले जात आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे दोन-चार आणि अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत.
भुजबळ कुटुंब दिसले की मारायला सांगतात; छगन भुजबळांचा जरांगेंवर गंभीर आरोप
सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न…
मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला आता संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दहा टक्के आरक्षण लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरू द्यावे यासाठी प्रयत्न केला जात आहे. मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.