भाजप 100 उमेदवारांची पहिली यादी ‘या’ दिवशी करणार जाहीर, मोदीं-शाहांच्या नावाचा असणार समावेश

  • Written By: Published:
भाजप 100 उमेदवारांची पहिली यादी ‘या’ दिवशी करणार जाहीर, मोदीं-शाहांच्या नावाचा असणार समावेश

Lok Sabha Elections : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वारे वाहू लागले आहेत. इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. तर भारतीय जनता पक्ष (BJP) 29 फेब्रुवारीला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू करणार असल्याची माहिती पुढं आली आहे. या यादीत 100 उमदेवारांची भाजप घोषणा करणार आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या लोकसभेच्या जागाही जाहीर केल्या जाऊ शकतात.

दोन मुली नशेच्या अवस्थेत सापडल्या ! अभिनेता पिट्या भाईची मदत आणि पुणेकरांना उद्गिन सवालही

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 29 फेब्रुवारीला होऊ शकते. या बैठकीनंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता आहे.

सूत्रांवर विश्वास ठेवला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचीही नावे पहिल्या यादीत असतील. पहिल्या यादीत 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला त्या जागांवर उमेदवारांची घोषणा करण्याची भाजपचही रणनीती आहे. यामध्ये उत्तर प्रदेशच्या 14 जागांचा समावेश आहे. तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मिर, ओडिशा, महाराष्ट्राच्या गमावलेल्या जागांचा समावेश असेल. याशिवाय या पहिल्या यादीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री आणि अमित शाह यासारख्या बड्या नेत्यांनाचाही समावेश असेल.

CM एकनाथ शिंदेबाबत धमकीची पोस्ट, मुंबई पोलिसांनी तरुणाला पुण्यातून केली अटक 

गेल्या आठवड्यात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशनही पार पडले. तत्पूर्वी, देशभरातील क्लस्टर प्रभारींची बैठक भाजपच्या विस्तारित कार्यालयात पार पडली. या बैठकीत 160 जागांचा लेखाजोखा मांडण्यात आला. यानंतर राष्ट्रीय अधिवेशनानंतर भारत मंडप समितीतर्फे मुख्यमंत्री परिषदेचे आयोजन कऱण्यात आलं होतं. या बैठकीत सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात माहिती घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी देशभरातील 100 उमेदवारांच्या नावांवर शिक्का मुहूर्त करण्यात आल्याची माहिती पुढं आली आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून या बैठकीनंतर उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. याआधी ही यादी जानेवारीअ खेरीस जाहीर होईल, असे वृत्त होते. मात्र त्याला विलंब होत होता. ज्या जागांवर पक्षाला विजयाचा मार्ग अवघड आहे, त्या जागांवर भाजप उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे. या निवडणुकीत मित्रपक्षांसह 400 हून अधिक जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube