दोन मुली नशेच्या अवस्थेत सापडल्या ! अभिनेता पिट्या भाईची मदत आणि पुणेकरांना उद्गिन सवालही

  • Written By: Published:
दोन मुली नशेच्या अवस्थेत सापडल्या ! अभिनेता पिट्या भाईची मदत आणि पुणेकरांना उद्गिन सवालही

Actor Ramesh Pardeshi on pune drug and youth : पुणे : पुणे (Pune) हे सांस्कृतिक शहर, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून येथील तरुण पिढी व्यसनाच्या चक्रात अडकली आहेत. पुण्यात नुकतेच चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्स पोलिसांनी (Pune Policee) जप्त केले आहे. त्यानंतर तरुणाई कशी ड्रग्सच्या व इतर व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. हे मुळशी पॅटर्न चित्रपटातील पिट्या भाई फेम अभिनेता रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) याने समोर आणले आहे. पुण्यातील एक टेकडीवर दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी या मद्यधुंद व नशाच्या अवस्थेत आढळून आल्यात. अभिनेते परदेशी याने इतरांच्या मदतीने या मुलींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. परंतु पुण्यात उपलब्ध होत असलेल्या नशेच्या पदार्थ्यांमुळे अभिनेते रमेश परदेशी हे उद्गिन झाले आहेत. हे असेच चालू राहिले तर पुण्याचे उडता पंजाब लवकरच होईल, असा उद्गिग्न सवालही त्याने उपस्थित केला आहे.

Ajay Barskar : ज्याची संपत्ती 300 कोटी तो 40 लाख का घेईल? बारस्करांचा जरांगेंना थेट सवाल

अभिनेता रमेश परदेशी हा शनिवारी एआरएआय टेकडीवर व्यायामासाठी आला होता. त्यावेळी त्याला दोन मुली या मद्यधुंद व इतर नशेच्या अवस्थेत दिसून आल्या. त्यातील एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या तोंडातून फेस येत होता. अभिनेते परदेशी यांनी इतरांच्या मदतीने या तरुणींना टेकडीच्या खाली आणले. त्यानंतर तरुणींच्या मित्रांना संपर्क साधून त्यांनी बोलून घेतले. नंतर दोन्ही तरुणींना रुग्णालयात दाखल केले आहे. एक मुलगी ठीक आहे. दुसरीची प्रकृती आता थोडी बरी होत आहे. ही सर्व परिस्थिती अभिनेता परदेशी याने फेसबुक लाइव्हद्वारे कथन केली. या मुली या पुण्यात लॉ कॉलेजच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असल्याचे समोर आल्या आहेत. दोघीही शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या आहेत. तर डोळ्यात अंजन घालणारे उद्गिन सवालही परदेशीने उपस्थित केले आहेत.

जीवाचे बरे वाईट झाले तर आई-वडिलांना काय करायचे?

ड्रग्समुळे तरुणी पिढीचा अवस्था वाईट झाली आहे. लहान मुलांना सहज पैसे मिळत आहे. त्यातून ते नशा करतात. जीवाचे बरे वाईट झाले तर आई-वडिलांना काय करायचे याचाही ते विचार करत नाही. पुण्यात आल्यानंतर त्यातून व्यसनी केली जात आहे. मलाही मुलगी आहे. मला हे बघून घाबरायला होते. प्रत्येक पुणेकरांनी या लक्ष देण्याची गरज आहे. शहरामध्ये शिक्षणासाठी मुले येतात. रात्री अपरात्री पब जातात. ड्रग्स घेतात. आई-बाप त्यांच्याकडे बघत नाहीत. खरे तर विचार करण्याची गरज आहे. पालकांनी व इतरांनी भाऊ-बहिण म्हणून याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे अभिनेते परदेशी यांनी म्हटले आहे.

तर पुण्याचा उडता पंजाब होण्यास वेळ लागणार नाही.

ललित पाटील प्रकरणही असेच होते. यावर केवळ राजकारण म्हणून पाहू नये. असेच चालू राहिले तर पिढी बरबाद होईल. याचा विचार करणे प्रत्येक पुणेकरांना गरजेचे आहे. नाही तर पुण्याचा उडता पंजाब होण्यास वेळ लागणार नाही असा उद्गिन्न सवालही परदेशीने उपस्थित केला आहे. पुण्यात पानटपऱ्यावर चरस, गांजा, ड्रग्स मिळत आहे. त्यामुळे पुण्याच्या संस्काराचे वाटोळे सुरू आहे. सर्व थांबविण्यासाठी पुणेकरांना आता तरी जागृक व्हावे, अशी हाक ही परदेशी यांनी मारली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube