Pune News : पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चार जणांना अटक
Pune News : पुण्यातील चंदननगर परिसरातील खराडीत पार्किंगच्या वादातून गाड्यांची तोडफोड करुन जाळण्याचा प्रकार घडला आहे. (puneattempt burn woman) धक्कादायक म्हणजे आरोपींनी एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह पाच जणांवर गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे.
राम चरण अन् सलमानच्या हस्ते होणार वरूण-मानुषीच्या Operation Valentine च्या ट्रेलरचं लॉन्चिंग
पोलिसांनी सराईत गुन्हेगार धिरज दिलीप सपाटे (वय-25 रा. तुकारामनगर, खराडी), आकाश सोकीन सोदे (वय-23 रा. चंदननगर), नयत नितीन गायकवाड (वय-19 रा. सानाथनगर, वडगाव शेरी), सुरज रविंद्र बोरुडे (वय-23 रा. उबाळेनगर, वाघोली), विशाल राजेंद्र ससाने (वय-20 रा. वाघोली मुळ रा. मु.पो. तांडोळी जि. पाथर्डी) यांच्यावर गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी धिरज सपाटे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
आरोपी व फिर्यादी एकाच परिसरात राहत असून शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास धिरज सपाटे हा त्याच्या इतर 13 साथीदारांना पाच दुचाकीवरुन घेऊन आला. गाडी पार्क करण्याच्या कारणावरुन फिर्यादीच्या चारचाकी नेक्सॉन गाडीच्या (एमएच 12 टीएच 7277) समोरील व साईडच्या काचा लाकडी दांडक्याने फोडल्या. या गाडीच्या पुढील सीटवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली.
“अजितदादांनी तीन वेळा शब्द फिरवला, आता विधानसभेला मदत केली तरच”.. अंकिता पाटलांचा थेट इशारा
त्याचवेळी फिर्यादींची भाडेकरु असणाऱ्या वर्षा दयाराम गायकवाड या घराच्या बाहेर आल्या असता त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तिथून पळून गेल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर आरोपींनी तिथेच उभी असलेल्या पल्सर गाडीची (एमएच 12 एमजी7272) टाकी फोडून नुकसान केले. या प्रकारामुळे परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाले होते. त्यावेळी आरोपी धिरज सपाटे याने कोणीमध्ये आला तर तुम्हांला सोडणार नाही अशी धमकी दिली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन चार जणांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी धिरज सपाटे याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.