राम चरण अन् सलमानच्या हस्ते होणार वरूण-मानुषीच्या Operation Valentine च्या ट्रेलरचं लॉन्चिंग

राम चरण अन् सलमानच्या हस्ते होणार वरूण-मानुषीच्या Operation Valentine च्या ट्रेलरचं लॉन्चिंग

Operation Valentine : ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ ( Operation Valentine ) या चित्रपटामध्ये दक्षिणात्य अभिनेता वरूण तेज आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर ( Manushi Chhiller) या ॲक्शन फिल्ममध्ये एअर फोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये देशभक्ती दाखवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि सलमान खानच्या हस्ते हा ट्रेलर लॉन्च करण्यात येणार आहे.

Chandrashekhar Bavankule : जयंत पाटील संपर्कात नाही पण सोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार; बावनकुळेंचं सुतोवाच

उद्या 20 फेब्रुवारीला या चित्रपटाच्या ट्रेलरचं लॉन्चिंग होणार आहे. या चित्रपटाचा टिझर लॉन्च झाल्यापासूनच तो चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये याआधी कधीही न दाखवण्यात आलेल्या ॲक्शन सीन्स दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा भारतीय वायुसेनेच्या सैनिकांकडून देशाच्या सुरक्षेसाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आव्हानांच्या सामन्यांची कथा आहे. ज्यामध्ये ॲक्शन रोमान्स आणि वरून आणि मानुषीची जबरदस्त केमिस्ट्री देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Draupadi Murmu यांचा बालपण ते राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास! इराणींकडून राष्ट्रपतींची खास मुलाखत

‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ हा चित्रपट सोनी पिक्चर्स अँड इंटरनॅशनल प्रोडक्शन तसेच संदीप मुड्डा यांच्या रेनेसो पिक्चर्स द्वारे निर्मित करण्यात आली आहे. त्याचबरोबर यामध्ये गॉड ब्लेस एंटरटेनमेंट आणि नंदकुमार अब्बिनेनी हे सहनिर्माते असणार आहेत. तर दिग्दर्शक शक्ती प्रताप सिंह हाडा हे या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहेत. त्याचबरोबर हाडा यांनी या चित्रपटाचा लेखन केलं आहे. तसेच या लेखनामध्ये आमिर खान आणि सिद्धार्थ राजकुमार यांचे देखील सहभाग आहे हा चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 ला तेलगू आणि हिंदी मध्ये देखील रिलीज होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube