Operation Valentine : ऑपरेशन व्हॅलेंटाइनची टीम पुलवामात; शहीदांना वाहिली श्रद्धांजली

Operation Valentine : ऑपरेशन व्हॅलेंटाइनची टीम पुलवामात; शहीदांना वाहिली श्रद्धांजली

Operation Valentine : मानुषी छिल्लर आणि वरुण तेज अभिनित ऑपरेशन व्हॅलेंटाइन (Operation Valentine) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत चालली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ऑपरेशन व्हॅलेंटाइनच्या संपू्र्ण टीमने जम्मू काश्मीरमधील लेथपोरा कॅम्प येथील पुलवामा स्मारक स्थळाला भेट दिली. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना चित्रपटाच्य टीमने श्रद्धांजली अर्पण केली. ‘ऑपरेशन व्हॅलेंटाइन’ हा आगामी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात मानुषी आणि वरुण तेज यांच्या मुख्य भूमिका दिसणार आहेत. ऑपरेशन व्हॅलेंटाईनच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असून प्रेक्षकही उत्सुक आहेत.

चित्रपटात हवाई दलातील योद्धा आणि त्यांनी देशाच्या संरक्षणासाठी केलेल्या अपार जिद्दीची कहाणी आहे. ऑपरेशन व्हॅलेंटाईन हा चित्रपट शक्तीप्रताप सिंह हाडा यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट उद्या (16 फेब्रुवारी) चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे. तेलुगू आणि हिंदी या दोन भाषांत हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Priyanka Chopra : ‘अनिफिनिश्ड’ आता हिंदीत; ‘अभी बाकी है सफर’ची जागतिक पुस्तक प्रदर्शनात एन्ट्री!

मानुषी छिल्लरने सम्राट पृथ्वीराज या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर आलेल्या द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटात विकी कौशलबरोबर मानुषी दिसली होती. काही दिवसांपूर्वी ऑपरेशन व्हॅलेंटाइनचा टीजर लाँच करण्यात आला होता. त्यातून हा एक दमदार चित्रपट असल्याचे दिसून येत आहे.

ऑपरेशन व्हॅलेंटाइन हा चित्रपट भारतीय सैन्याच्या सर्वात मोठ्या एअर स्ट्राईकवर आधारीत आहे. व्हॅलेंटाइन डे या दिवशीच पुलवामात भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला झाला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय एअरफोर्सने थेट पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केली होती. या घटनेवर हा चित्रपट आधारीत आहे.

तेलुगू स्टार वरुण तेज मुख्य भूमिकेत आहे. फायटर पायलटच्या वेशभूषेत दिसत आहे. या लूकमध्ये वरुण अगदीच डॅशिंग दिसत आहे. त्याच्याबरोबर मानुषी छिल्लरचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात मानुषी सुद्धा एअर फोर्समध्ये असल्याचे दाखवले आहे. या चित्रपटाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत.

रणबीरच्या ‘रामायण’मध्ये रामाची एन्ट्री! अरुण गोविल यांच्यामुळे अमिताभ यांचा पत्ता कट?

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube