Manushi Chhillar : ‘रब है गवाह’; ऑपरेशन व्हॅलेंटाईनमधील दुसरं गाणं रिलीज…

Manushi Chhillar : ‘रब है गवाह’; ऑपरेशन व्हॅलेंटाईनमधील दुसरं गाणं रिलीज…

Manushi Chhillar : बॉलिवूड विश्वास अभिनेत्री मानुषी छिल्लरने चांगलाच जम बसवला आहे. तिने आपले चाहते आणि फॉलोवर्सवर छाप पाडली आहे. आता व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर मानुषी छिल्लरचा एक चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ऑपरेशन व्हॅलेंटाईन असं या चित्रपटाचं नाव लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याआधीच चित्रपटातील दुसरं गाणं ‘रब है गवाह’ गाणं रिलीज झालं आहे.

मागील महिन्यातच ऑपरेशन व्हॅलेंटाईनचा पहिला भाग वंदे मातरम प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये देशभक्तीचे दृश्य टिपल्याने प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शक्ती प्रताप सिंग हाडा दिग्दर्शित रब है गवाह आणि दुसरं गगनाला हे तेलगू गाणे रिलीज करण्यात आलं आहे. प्रेक्षकांकडून या गाण्यांचा भलतीच पसंत मिळत असल्याचं दिसून येत आहे.

आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या पडद्यामागच्या ‘पाच’ खेळ्या’ अन् झारखंड भाजपच्या हाताला लागलेच नाही

चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, ऑपरेशन व्हॅलेंटाईन मानुषी छिल्लरचे वरुण तेजसोबतचे पहिले ऑन-स्क्रीन असणार आहे. चित्रपटाचे पोस्टर्स आणि झलक पाहिल्यानंतर दिसतं की, प्रेक्षक मोठ्या ट्रीटसाठी आहेत. आगामी चित्रपटात मानुषी रडार ऑफिसरची भूमिका साकारून एक अभिनेता म्हणून स्वत:चा शोध घेते. ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ हा चित्रपट 1 मार्च 2024 रोजी तेलुगू आणि हिंदीमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा…अजितदादा व जितेंद्र आव्हाडांमध्ये जोरदार जुंपली!

दरम्यान, रब है गवाह गाण्याला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून अद्याप हा चित्रपट रिलीज झालेला नाही. येत्या 1 मार्च 2024 रोजी हा चित्रपट तेलगूसह हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube