Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीसांना काड्या करायची सवय असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. एक उपमुख्यमंत्री कलाकार, सर्व भाजच विद्रुप करुन टाकला असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांकडून जाळपोळाच्या घटना घडल्याचं दिसून आलं. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता टीका केली आहे.
‘फडणवीसांनी आधी राजीनामा द्यावा’; जाळपोळ घटनेवर एकनाथ खडसेंची सरकारला सुनावलं
मनोज जरांगे म्हणाले, बस्स् झालं आता हे लहान आणि मोठा भाऊ. लहान मोठ्याला मानत नाही मग कशाला पाहिजे लहान आणि मोठं. लहान भाऊ आमचचं खातो तर गोड लागतं का? आता मोठ्या भावाला द्यायची वेळ आली आहे, तर म्हणता आम्ही रस्त्यावर येऊ, या रस्त्यावर तुम्हाला कोणत्या सरकारची फूस आहे तर बघू. यातला एक उपमुख्यमंत्री कलाकार आहे त्याच्याकडं बघायला लागणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.
Maratha Reservation : ‘xx च्या उलट्या बोंबा’; उद्धव ठाकरेंना भाजपचं जोरदार प्रत्युत्तर
तसेच बाळा तू लोकांना थांबव तू लोकांना बिघडवू नकोस. एकतर सर्व भाजप विद्रुप करुन टाकलंय, रंगीबेरंगी लोक आणून ठेवलेत सरकारमध्ये. आम्ही तुमचा आदर करतो पण तुम्ही समाजाबाबत व्यवस्थित निर्णय घ्या, कायदा सुव्यवस्था बिघडवू नका. तुम्हाला लोकांमध्ये भांडणं लावून दिल्याशिवाय जमतंच नाही इतक्या खोड्या काढता तुम्ही? असंही ते म्हणाले आहेत.
फडणवीसांचा छत्तीसगड प्रचार दौरा वादात; महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडल्याचा विरोधकांचा आरोप
आता यांनीच म्हटलं आहे की ते पण रस्त्यावर येणार आहेत. ओबीसी बांधवांना मी सांगतो तुम्ही विनाकारण रस्त्यावर येऊ नका. मराठे रस्त्यावर येणार नाहीत. यांचा पहिल्यापासून इतिहास आहे, यांनी गोरगरिबांना झुंजायला लावलं आहे एकमेकांविरोधात. यांचा भारतात पहिल्यापासूनचा इतिहास आहे, हे मलिदा खातात घरात बसून, पण यंदा उलटं होणार आहे यांनी जर ओबीसी आणि मराठ्यात झुंज लावली तर यांना घरात बसूनच द्यायचं नाही. जो मजा बघतो त्याच्याच मागं लागायचं. तुम्ही मराठ्यांच्या शांततेच्या युद्धात येऊ नका. तुम्हाला हात जोडून सांगतो. तुम्ही आमचा निर्णय तातडीनं मार्गी लावा, असंही जरांगे यावेळी म्हणाले आहेत.