Maratha Reservation : केंद्राला अन् राज्याला रामाने आरक्षण देण्याची सुबुद्धी द्यावी, असं साकडं मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी नववर्षनिमित्त प्रभू रामलल्लाकडे घातलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी पायी दिंडीची घोषणा केल्यानंतर सरकारने 20 जानेवारीआधीच आरक्षणाबाबत विचार करुन मराठा आरक्षण जाहीर करावे, असाही सल्ला मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. जरांगे पाटील बीडमध्ये एका विवाह सोहळ्या निमित्त बीडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
मनोज जरांगे म्हणाले, प्रभू श्रीरामाने अन्यायाविरोधात लढा उभारला होता. आमच्यावर देखील गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झालाय. आता तो दूर करण्याची सद्बुद्धी प्रभू श्री रामचंद्राने केंद्र व राज्य सरकारला द्यावी. सरकारने मराठा आरक्षण जाहीर करावे. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हाच आजच्या नवीन वर्षाचा संकल्प असेल. मराठा समाजाच्या अनेक पिढ्या आरक्षणाअभावी बरबाद झाल्या आहेत. आता भावी पिढीसाठी प्रत्येकाने घराबाहेर पडायचे, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी यावेळी केले आहे. आता ही आरक्षणाची लढाई निर्णायक असल्याचंही जरांगे पाटली म्हणाले आहेत.
दिलासादायक बातमी! वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडरच्या किंमतीत कपात, जाणून घ्या आजचे दर
चंद्रकांत पाटलांचं विधान सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणाबाबत :
चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य हे सुप्रीम कोर्टातील आरक्षणाबाबत असेल, आम्हाला आधीपासूनच आरक्षण आहे. आता पुरावे देखील सापडले आहेत, त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण द्यावे. अशी आमची मागणी असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
भुजबळ कामातून गेलेत…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात जोरदार धुमश्चक्री होत आहे. जाहीर सभेतून मनोज जरांगे यांनी व्यक्तीगतपणे छगन भुजबळांवर टीकास्त्र सोडले आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता छगन भुजबळांची बीडमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेवरही जरांगेंनी भाष्य केलं आहे. छगन भुजबळ यांच्याबाबत काय बोलावं? ते कामातून गेले आहेत, लोकशाहीत प्रत्येकाला सभा घेण्याच अधिकार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.