Download App

‘न्यायमंदिर आम्हालाही न्याय देईल’; न्यायालयाच्या नोटीशीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची पदयात्रा मुंबईकडे कूच करत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, जरांगे यांची पदयात्रा मुंबईत न येण्यासाठी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने जरांगे यांना नोटीस बजावली आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. न्याय मंदिर आम्हालाही न्याय देईलच, आमचे वकील न्यायालयात जाणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं आहे.

अयोध्येतील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जमीन अदानी समुहाला विकली? भाजप नेत्याच्या कंपनीचे कनेक्शन उघड

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने काय काढलं काय नाही ते बघू न्याय मंदिराने काय निर्णय दिलाय आधी तो पाहू.. न्याय मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात. त्यांना न्याय मिळाला आम्हालाही न्याय मिळेलंच, न्याय मंदिर आम्हालाही न्याय देईलचं आमचेही वकील जातील काय ते बघतील, अशी पहिली प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे.

Shiv Chhatrapati Award : ‘त्या’ सात खेळांचा ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्कारात पुन्हा समावेश

याचिका दाखल करताना वकील सदावर्तेंनी म्हटलं, जरांगेंची पदयात्रा मुंबईत आल्यास जनजीवन विस्कळीत होणार आहे. त्यावरही जरांगे यांनी थेट भाष्य केलं आहे. ते म्हणाले, जनजीवन विस्कळीत होणार नाही. आम्ही शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. मुंबईला आम्ही गाड्यांनी नाहीतर कसं जावं का उडत जावा..रस्त्यानेच वाहनाने जावं लागेल. आमच्या न्यायासाठी आम्ही जायंचं नाही असं असतं का? असा सवाल करत जरांगे यांनी संताप व्यक्त केला आहे.

Bade Miyan Chote Miyan चा धडाकेबाज टीझर रिलीज; टायगर-अक्षयच्या ॲक्शनने चाहते थक्क

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या पदयात्रेविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीयं. तर सदावर्तेला काय करायचं आहे ते करु द्या आम्ही त्याला एवढं महत्व देत नसल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी एका वाक्यातच विषय संपवल्याचं दिसून आलं आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत आल्यास इथले जनजीवन विस्कळीत होईल. त्यामुळे त्यांना मुंबईत येण्यासपासून थांबवावे. त्यांना मुंबईत आंदोलनाची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी करत सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी झाली. यावर मुंबईतील मराठा आंदोलनामुळे इथले जनजीवन विस्कळीत होणार नाही ही जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे म्हणत यावर जरांगे पाटील यांनीही म्हणणे मांडावे, यासाठी त्यांना नोटीस द्यावी असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

follow us