Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं. सरकारला 40 दिवसांची मुदत देऊनही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागली नाही. त्यामुळं त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. या दरम्यान मनोज जरांगे यांच्या मुलीने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Sunny Leone: मामी प्रीमियरमध्ये सनी लिओनीचा ‘केनेडी’ भारतीय चित्रपटसृष्टीत गेम चेंजर ठरला!
जरांगेंची कन्या सरकारवर भडकली…
जरांगेंच्या उपोषणा दरम्यान जरांगे यांच्या कुटुंबीयांनी माध्यमाशी संवाद साधला यावेळी जरांगे यांची मुलगी पल्लवी जरांगे हिने अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कारण सध्या अजित पवार हे डेंग्यू आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे ते कोणत्याही शासकीय कार्यक्रमांमध्ये आणि मराठा आरक्षणा संदर्भात आंतरवाली सराटीमध्येही जाऊ शकत नाहीत. त्यावरून तिने ही टीका केली आहे.
The Lady Killer: अर्जुन कपूर अन् भूमी पेडणेकरच्या ‘द लेडी किलर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित!
काय म्हणाली पल्लवी जरांगे?
माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, माझे वडिल म्हणाले आहेत की, माझ्या कुटुंबाला समोर आणू नका. त्याला सरकारच जबाबदार आहे. माझ्या वडिलांची स्थिती पाहून आईची अवस्था वाईट झाली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा आरक्षणा संदर्भात आंतरवाली सराटीमध्ये येणार होते. पण ते येऊ शकणार नाहीत. कारण त्यांना डेंग्यू झाला आहे. मात्र ते इतर कार्यक्रमाला जातात. मराठा आरक्षण म्हटलं की, लगेच ते आजारी पडतात. असं सडेतोड उत्तर जरांगेंच्या मुलीने दिलं आहे.
अजित पवार यांना डेंग्यूची लागण
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी ‘एक्स’वरुन याबाबत माहिती दिली. अजित पवार यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती पटेल यांनी दिली. मागील काही दिवसांपासून अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळण्याने त्यांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात येत होते. त्यावर पटेल यांनी त्यांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे स्पष्ट केले.