Sunny Leone: मामी प्रीमियरमध्ये सनी लिओनीचा ‘केनेडी’ भारतीय चित्रपटसृष्टीत गेम चेंजर ठरला!

Sunny Leone: मामी प्रीमियरमध्ये सनी लिओनीचा ‘केनेडी’ भारतीय चित्रपटसृष्टीत गेम चेंजर ठरला!

Sunny Leone On Mami Film Festival: पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी (Sunny Leone). सनीने सुरुवातीला अनेक अडल्ट चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर सनी भारतात आली. सनीचे ‘बेबी डॉल’ हे आयटम साँग हिट ठरले. आता सनी लिओनीचा बहुचर्चित प्रशंसित सिनेमा ‘केनेडी’ चा 2023 च्या मुंबई अकादमी ऑफ द मूव्हिंग (Mumbai Film Festival) इमेज (Mami Film Festival) चित्रपट महोत्सवात भव्य प्रीमियर झाला. या प्रीमियरमध्ये प्रेक्षकांना चांगलच मोहित केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)


मामी मधल्या खास स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील (Bollywood) दिग्गज कलाकार आणि चित्रपट रसिकांनी हजेरी लावली होती. या वर्षाच्या मे महिन्यात ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’च्या ‘मिडनाईट स्क्रीनिंग’मध्ये प्रीमियर झाल्यापासून ‘केनेडी’ने जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसा मिळवली आहे. सनी लिओनीची ‘चार्ली’ भूमिकेला देखील सर्वत्र प्रेम मिळवत असल्याचे बघायला मिळत आहे.

“केनेडी” ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम तर दिलं ज्याने सनी लिओनच्या सिनेमॅटिक प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. MAMI मधील चित्रपटाचा पदार्पण भारतीय चित्रपटाच्या सतत बदलणाऱ्या लँडस्केपमधील तिची भूमिका स्पष्टपणे अधोरेखित करतो.

The Lady Killer: अर्जुन कपूर अन् भूमी पेडणेकरच्या ‘द लेडी किलर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित!

सनी लिओनी ही केवळ फॅशन आयकॉन आणि स्टार नाही तर आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्यासाठी तयार असलेली एक अष्टपैलू कलाकार देखील आहे. जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांसारख्या ख्यातनाम अभिनेत्यांसह ‘कोटेशन गँग’ मधून ती लवकरच तमिळ चित्रपट उद्योगात पदार्पण करणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube