Download App

‘मनोज जरांगेंचा रिमोट शरद पवारांच्या हाती’; जरांगेंच्या महिला सहकाऱ्याचा गौप्यस्फोट

Sangeeta Wankhede On Manoj Jarang patil : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. तरीही मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) पुन्हा उपोषण करण्यावर ठाम असल्याचं सांगत आहेत. अशातच मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. अजय बारस्कर महाराजांनंतर आता मनोज जरांगे यांच्या महिला सहकारी संगिता वानखेडे (Sangeeta Wankhede) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मनोज जरांगे यांचा रिमोट शरद पवार यांच्या हाती असल्याचा गौप्यस्फोट वानखेडेंनी लेटस्अप मराठीशी बोलताना केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

Sanjay Raut : नड्डांचा सल्ला 25 लाखांचा पेन 15 लाखांचा सूट वापरणाऱ्या मोदींना लागू; राऊतांचा टोला

जरांगेचं शेपूट लांबतच गेलं…
मागील अनेक वर्षांपासून संगिता वानखेडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलनात सक्रिय आहेत. याआधीही मराठा क्रांती मोर्चात त्यांचा सहभाग होता. आता मनोज जरांगे यांनी उभारलेल्या आंदोलनातही संगिता वानखेडे सक्रिय होत्या. भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध करताच त्यांनी भुजबळांवर सडकून टीका केली होती. अखेर आता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांना घरचा आहेर दिला आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेवरुन वानखेडे आक्षेप नोंदवला आहे. जेव्हा अंतरवली सराटीत हल्ला झाला त्यानंतर जरांगेंचं शेपूट लांबवत गेलं होतं. आधी मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी नंतर सरसकट मराठ्यांना नंतर सगेसोयरे म्हणजे तुमचं जे शेपूट आहे ते लांबवत चाललं. मनोज जरांगेंनी कधी कोणत्या सहकाऱ्याला विचारुन निर्णय घेतले आहेत. कोणता सहकारी असं म्हणत आहे त्याने पुढे यावं? असं खुलं आव्हानच वानखेडेंनी दिलं आहे.

शिंदेंची पुन्हा कोंडी! दहावी-बारावीच्या विद्यार्थांचा विचार करत जरांगेंनी जाहीर केला मायक्रो प्लॅन

तसेच मनोज जरांगेंचं रिमोट दुसऱ्यांच्या हातात आहे, हा कुठल्याही सहकाऱ्याला विचारत नव्हता. मनोज जरांगेंचा रिमोट शरद पवारांच्या हातात आहे मी मरणाला भीत नाही त्यामुळे थेटपणे सांगत आहे. त्याचं कारण म्हणजे पुण्यात जरांगेंचे बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत. जो शरद पवार याआधी मराठा आरक्षणाला विरोध करीत होता. आता त्याचे कार्यकर्ते बॅनर का लावत आहेत. बाकीचं सभा कोणी घेतल्या हे सर्वांनाच माहित आहे, सभेसाठी करोडो रुपये, जेसीबी कुठून आले चेक करा? मी आता विरोध करीत नाही, दीड महिन्यांपासून विरोध करत आहे कुठून आले पैसे. तो खर्च मराठा आरक्षणासाठी नव्हता तर वातावरण विस्कळीत करण्यासाठीच असल्याचा आरोप संगिता वानखेडे यांनी केला आहे.

आता सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिलं आहे. कुणबी दाखल्यामुळेही ओबीसीतून आरक्षण मिळत आहे. सरकारने कुणबी दाखले बंद केलेले नाहीत. ज्यांचे कुणबी दाखले त्यांना ओबीसीतून आणि ज्यांचे नाही त्यांना 10 टक्के आरक्षण मिळणार आहे मग अडचण काय आहे. अनेक जण म्हणतात की टिकणार नाही 22 राज्यात आरक्षण टिकलं आहे संविधानात असं कुठं लिहिलं की टिकणार नाही. आता निवडणूक जवळ आली आहे, संपलेल्या पक्षाच्या हाती मनोज जरांगेंचा रिमोट असून संपलेल्या पक्षाची जरांगे व्होटबॅंक आहे. त्या पक्षाने याला भरपूर ताकद लावली . त्यांना मदत करणारे सर्वच कार्यकर्ते शरद पवार गटाचे होते, असा आरोपही वानखेडेंनी केलायं.

follow us