Download App

Maratha Reservation : आता फसवणूक बस्स झाली; भ्रष्ट जमुलेबाज पार्टी उल्लेख करीत सुळेंचा हल्लाबोल

Supriya Sule Speak On Maratha Reservation : आता फसवणूक बास झाली. ही भ्रष्ट जुमलेबाज पार्टीला माझी विनंती असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार राज्यात एक आणि दिल्लीत एक बोलतं असल्याचा गंभीर आरोपही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळला असल्याचं पाहायला मिळालं. आठ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर अखेर काल मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं आहे. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी थेट भाष्य केलं आहे.

Ketaki Chitale: ‘एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?’, आरक्षणावर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

मराठा आरक्षणासाठी आधी केलेल्या उपोषणात मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. मात्र, 40 दिवसांत राज्य सरकारने ठोस पाऊले उचलली नसल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा अंतरवली सराटीत उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. मागील नऊ दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरु होतं. जरांगेंच्या समर्थनात राज्यभरात मराठा आंदोलकांनी जाळपोळ, आंदोलन, मोर्चे काढल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने पुन्हा जरांगेंची भेट घेऊन वेळ मागवून घेतला आहे.

Reliance : नव्या इंटरनेट जगतात भारताची एन्ट्री! सॅटेलाइट आधारित इंटरनेट लाँच

एकूण या परिस्थितीवर सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहे. सुळे म्हणाल्या, राज्य सरकारला खोटं आणि रेटून चांगलं बोलता येत, पण आता फसवणूक बास झाली. ही भ्रष्ट जुमलेबाज पार्टीला माझी विनंती असल्याची खोचक टीक सुळे यांनी केली आहे.

वानखेडेवर पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचे अनावरण

तसेच देश नियम कायद्याने चालतो अदृश्य शक्तीने नाही चालत. संविधानाने देश चालत नसेल तर आम्हाला संघर्ष करावाच लागेल. ही दडपशाही नाहीतर लोकशाही आहे. मात्र देशात दिल्लीतील अदृश्य शक्तीमुळेच सर्व काही घडत असल्याचा आरोपही सुळे यांनी केला आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख अदृश्य शक्ती असा केला आहे. यावेळी बोलताना सुळेंनी मोदींचं नाव न घेता हल्लबोल केला आहे.

follow us