Download App

मराठा आरक्षणावर तोडगा! मुख्यमंत्री शिंदे-शरद पवारांमध्ये गुप्तगू; चर्चेत काय घडलं?

विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या बैठकीला पाठ फिरवल्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीयं. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी चर्चा केलीयं.

Cm Eknath Shinde & Shard Pawar : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर उभे ठाकल्याची परिस्थिती आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसलंय तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात झाली. आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) विरोधकांची बैठक बोलावली खरी पण विरोधकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत चर्चा केलीयं. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे.

Hastay Na Hasaylach Pahije : निलेश साबळेच्या शोने तीन महिन्यातच गुंडाळला गाशा, काय आहे नेमकं कारण?

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांना अनेक आश्वासने देण्यात आले होते. मनोज जरांगे यांची रॅली मुंबईत धडक घेताच वाशीत मुख्यमंत्री शिंदेंनी सर्वच मागण्या मान्य करणार असल्याचा शब्द दिला होता. त्यानंतर शब्द न पाळल्याने पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पुन्हा शिंदेंनी आश्वासने दिली. मराठा समाजापाठोपाठ ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही जालन्यात उपोषणाचं हत्यार उपसून सरकारची कोंडीच केल्याचं पाहायला मिळालं होतं. उपोषणादरम्यान, शिंदेंनी हाकेंनाही आश्वासने दिली होती. या आश्वासनांबद्दल विरोधक नेत्यांना काहीही माहिती नसल्याचा सूर आवळण्यात आला होता.

मला कुणी विरोधक नाही; असं का म्हणाले नगरचे खासदार? पाहा लेट्सअप मराठीवर बेधडक निलेश लंके

आता शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना मराठा आणि ओबीसी समाजाने वेळोवेळी केलेल्या आंदोलनादरम्यान, काय काय आश्वासने दिली होती. याबाबत शरद पवार यांना माहिती दिलीयं. शरद पवारांनीही याबाबत शिंदेंची भूमिका ऐकून घेतली असून आता या चर्चेनंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जाणार? याकडे मराठा समाजासह संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय.

मुंडे, तावडे फ्रंट सीटवर; राज्याच्या राजकारण दोघांचेही जबरदस्त कमबॅक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिंदे सरकारकडून 9 जुलै रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधकांनी पाठ फिरवली होती. या प्रकारानंतर अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झालीयं.

follow us