Download App

Maratha Reservation : शरद पवार गटाचं एक पाऊल पुढं; राज्यपालांना घातलं साकडं

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच तापत आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला दिलेली मुदत संपली असून पुन्हा एकदा जरागेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांच्या उपोषणावर सरकारने अद्याप कोणती ठोस भूमिका घेतल्याचं दिसून आलेलं नाही. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार(Sharad Pawar Group) गटाकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आलं आहे. शरद पवार गटाच्यावतीने खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), आमदार जयंत पाटील(Jayant Patil) आणि आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी राज्यपाल रमेश बैस(Ramesh Bais) यांना निवदेनाद्वारे आरक्षण प्रकरणात लक्ष घालून सोडवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी एक्सद्वारे माहिती दिली.

राज्यात एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणच्या संदर्भात आमरण उपोषण करत आहेत. तर दुसरीकडे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार अपयशी ठरत असल्याचं पाहायला मिळतयं. त्यामुळे आता राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालून हे प्रकरण सोडवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांना करण्यात आली आहे.

मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण; तब्येतीविषयी आली अपडेट

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी मनोज जरांगे यांनी उपोषण केल्यानंतर सरकारने अध्यादेश काढत मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी एका समितीची स्थापना केली. समितीला काही दिवसांचा अवधी दिल्यानंतर पुन्हा समितीला अवधी वाढवून देण्यात आला आहे. अशातच मनोज जरांगे यांनी दिलेली मुदत संपल्याने मनोज जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण सुरु करुन सरकारची चांगलीच कोंडी केल्याचं पाहायला मिळत आहे.

Horoscope Today: आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता

मनोज जरांगे यांनी आधी उपोषण केल्यानंतर राज्यभरात दौरे केले. त्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाबद्दल जागृती करुन सरकारवर चांगलाच निशाणा साधत असल्याचं दिसून आले. राज्यभर दौरा केल्यानंतर आता मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. एवढच नाहीतर मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. नांदेडमध्ये खासदार प्रताप चिखलीकर पाटलांच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचंही समोर आलं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारसह स्थानिक नेत्यांनाही नामुष्की केल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाऊल उचलली जात आहे. राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आल्यानूसार खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांनी राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनवणी केली आहे. त्यामुळे आता तरी सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणार का? असा सवाल मराठा तरुणांना पडला आहे.

follow us