Download App

NCP Political Crisis : पवारांची ‘लेडी जेम्स बाँड’ अजितदादांसह 9 आमदारांना स्वगृही आणणार?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला. मात्र, त्याआधीही असे अनेक राजकीय भूकंप घडलेले आहेत. 23 नोव्हेंबर 2019 हा दिवस तितकाच महत्वाचा आहे. या दिवशी विशेष असे काही घडले नव्हते पण जे काही घडले होते ते मात्र विलक्षण होते. ज्या पद्धतीने बातमी येते की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकार बनवले आणि सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला.

ही बातमी ऐकून प्रत्येकालाच धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांपैकी काही आमदार शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटले मात्र त्यात असेही काही आमदार जे त्यांना भेटले नाहीत. भाजपाची खासगी विमाने वाट पाहत उभी होती. मात्र चार पैकी फक्त एकच विमान दिल्ली गाठू शकले. या चार आमदारांना हरियाणातील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, या आमदारांना राष्ट्रवादीच्या सोनिया दुहन यांनी यशस्वीपणे बाहेर काढत भाजपाचा प्लॅन फेल केला.

आताही त्यांच्या याच धडाडीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची दिल्लीच्या कार्यालयाच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. आता दुहन या 2019 मध्ये केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, अजितदादांसह बाकीच्या 9 आमदारांना पुन्हा स्वगृही आणणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

2019 मध्ये काय घडलं? आमदार कसे सोडवले? 

एखाद्या हिंदी चित्रपटात जसे कुणाचे अपहरण केल्यानंतर त्याच्या सुटकेसाठी प्लॅन तयार केला जातो आणि त्याची सूत्रे कुणा एका सक्षम व्यक्तीकडे सोपविली जातात. राष्ट्रवादीनेही (NCP) अगदी तसेच केले. हे आमदार नेमके कुठे आहेत याची माहिती काढण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवा आघाडीचे अध्यक्ष धीरज शर्मा यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या. धीरज शर्मा हे हरियाणाचेच होते. जर शक्य असेल तर या आमदारांना तेथून बाहेर काढण्याचाही प्लॅन तयार करा, असे पवार यांनी शर्मा यांना सांगितले होते.

योद्धा मैदानात! शरद पवारांचा दौरा ठरला; दिल्लीतील खलबतांनंतर महाराष्ट्र काढणार पिंजून

पण, त्यावेळी शर्मा मात्र काही कामानिमित्त पुण्यात होते. मग त्यांनी ही कामगिरी पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन (Sonia Duhan) यांच्याकडे सोपविली. दुहन या हरियणा कुरुक्षेत्र विश्वविद्यालयात राजनिती विज्ञान विषयाच्या विद्यार्थीनी होत्या. त्या गुडगाव येथे होत्या. एका लग्न समारंभात जाण्याची तयारी करत होत्या. मात्र त्यांना हा संदेश मिळाल्यानंतर त्यांनी आपला प्लॅन रद्द केला.

दुहन यांनी ही कामगिरी स्वीकारली. काही महत्वाचे फोन केले. त्यानंतर त्यांना कळले की आमदार गुडगावातील एका हॉटेलमध्ये आहेत. काही पोलीस आणि भाजप कार्यकर्ते त्यांच्या संरक्षणात आहेत असेही कळले. त्यानंतर त्यांनी आणखी काही प्लॅन तयार केले. आमदार कोणत्या खोलीत आहेत त्या खोलीचा नंबर मिळवण्यात त्या यशस्वी ठरल्या.

या अतिशय गुप्त योजनेसाठी 180 लोकांना निवडण्यात आले होते. यामध्ये स्थानिक महिलाही सहभागी होत्या. या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आमदार नेमके कुठे आहेत याची माहिती काढणेही कठीण होते. आमदार पाचव्या मजल्यावरील खोलीत होते. यामध्ये चांगली गोष्ट अशी होती की सोनिया दुहन यांच्या घरापासून हे हॉटेल फक्त तीन किलोमीटर अंतरावर होते.

शिंदेंच्या शिलेदारांना निधीसाठी पुन्हा पवारांकडेच जावं लागणार? राष्ट्रवादीचा ‘अर्थ’ खात्यावर दावा!

या कामगिरीची माहिती देताना दुहन म्हणाल्या, ज्यावेळी मी त्या हॉटेलमध्ये प्रवेश केला तेव्हा तळमजल्यावर 100 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. त्यांनी कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. त्यामुळे माझी खात्री झाली की मला माझ्या सूत्रांकडून जी माहिती मिळाली ती खरी आहे.

येथे गुडगावचे वरिष्ठ भाजप नेते, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एक पोलीस निरीक्षकही येथे हजर होते. मी तत्काळ अधिकाऱ्याला फोन केला आणि विचारले तुम्ही कुठे आहात. तो म्हणाला मी येथेच आहे. मी विचारले हॉटेलमध्ये नेमके काय होत आहे. या प्रश्नाने तो चकीत झाला. म्हणाला ते मला काही विचारू नका. या प्रकरणात मी तुमची काहीही मदत करू शकत नाही.

त्या पुढे म्हणाल्या, आम्ही पाचव्या मजल्यावर खोली बुक करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, या मजल्यावरील सर्व खोल्या बुक असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. मग आम्ही वेगवेगळ्या मजल्यांवर चार खोल्या बुक केल्या. ज्यावेळी हे सगळे आत होते तेव्हा आमदारांना वाचविण्यासाठी तीन प्लॅन तयार केले होते. आम्ही हॉटेलच्या व्यवस्थापकाला विश्वासात घेतले त्यांना मदत करण्याची विनंती केली. तो घाबरला होता. नोकरी जाण्याची भीती त्याला होती. त्यावर त्याला मुंबईतील कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन व्यवस्थापकाला दिले.

त्यानंतर व्यवस्थापकाने हॉटेलची काही महत्वाची माहिती आणि बारकावे सांगितले. त्याने सांगितले की आमदारांनी गुप्त दरवाजाच्या माध्यामातून बाहेर काढले जाऊ शकते. दुसरा प्लॅनही तयार होताच. आमदारांना स्वीमिंग पूल येथे घेऊन येणे आणि आतील रस्त्याद्वारे बाहेर काढणे. शेवटची योजनेत थेट आमदारांच्या खोलीत जाऊन त्यांना काहीही करून बाहेर काढणे ही होती. एवढ्या वेळात धीरज शर्मा दिल्लीत पोहोचले होते. ते ही या कामगिरीत सहभागी झाले.

ओबेरॉय हॉटेलात असलेल्या या आमदारांकडील फोन काढून घेतले होते. त्यांना साधे फोन दिले होते. त्यांना फक्त कुटुंबियांशी बोलण्याची परवानगी होती. आमच्याकडे त्यांचे फोटो होते त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण नव्हते.

केसीआर पंकजा मुंडे यांना फोन करणार? बीआरएस नेत्याने स्पष्टच सांगितलं…

विद्यार्थी आघाडीच्या सदस्याने हॉटेल लाँड्री प्रभारीला सांगितले की एका आमदाराला बोलवा त्यांना सांगा की कपडे धुण्याला आणि प्रेस करण्यास वेळ लागेल त्यांना काही अडचण नाही ना. त्यानंतर कपडे धुणाऱ्या व्यक्तीने आमदार अनिल पाटील यांना फोन केला. त्यानंतर या व्यक्तीने सांगितले की अजित पवार यांनी काही व्यक्ती हॉटेलमध्ये पाठवले आहेत.

अजितदादांचं नाव ऐकलं अन् आमदारांना हायसं वाटलं

अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव ऐकल्यानंतर पाटील यांना खात्री झाली की काहीतरी गंभीर घडले असेल. ते बाहेर येण्यास तयार होते. त्यांनी अन्य तीन आमदारांनाही याची माहिती दिली. कपडे धुणाऱ्या व्यक्तीने इंटरकॉमच्या मदतीने चारही आमदारांना त्यांच्या खोलीत बोलावले. त्यांना सांगितले की पुढील दोन मिनिटात स्वीमिंग पुलाजवळ या. त्यानंतर आमदारांना भाजपाच्या लोकांना सांगितले आणि पुलाकडे पळाले. दुहनही तत्काळ त्या ठिकाणी आल्या. दुहन त्यातील कुणाही आमदाराला ओळखत नव्हत्या. पण त्यांनी पक्षाचे नाव राकांपा अशा भाषेत सांगितले. त्यानंतर पाटील आणि दरोडा या दोन आमदारांनी तत्काळ हो असे उत्तर दिले.

पळा पळा बाहेर कार उभी आहे 

त्यानंतर दुहन त्यांची कार घेण्यासाठी निघाल्या. इतक्या वेळात भाजप कार्यकर्त्यांनी आमदार पळाले असा ओरडा सुरू केला होता. त्यानंतर शर्माची टीम आणि भाजपाच्या कार्यकर्त्यात धक्काबुक्कीचा प्रसंग घडला. दुहन यांनी आमदारांना सांगितले की पळा एक लाल रंगाची कार बाहेर आहे त्यात जाऊन बसा. शर्मा तेथे होतेच. अशा पद्धतीने या आमदारांना हॉटेलमधून बाहेर काढण्याचा प्लॅन यशस्वी झाला.

Tags

follow us