Download App

‘खोट्या कुणबींना ओबीसीत घुसवलयं’; छगन भुजबळांचा थेट आरोप…

Chagan Bhujbal News : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर राज्य सरकारकडून कुणबीच्या नोंदी सापडण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून अनेक कुणबी नोंदी असलेले पुरावे सापडले आहेत. राज्यभरातून 54 लाख नोंदी आढळून आल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी या नोंदींवर आक्षेप घेतला आहे. खोट्या कुणबींना ओबीसीत घुसवलं जात असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केला आहे.

‘देशातील 27 टक्के ओबीसी आरक्षण घालवू’, भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा घणाघात

छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कार्यक्रम जो शुक्रिया आयोगाकडून सुरु आहे. त्याला स्वरुप देण्याचं काम होणार आहे. राज्य सरकारकडून येत्या 15 किंवा 16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावून कायदा पारित करण्याच्या हालचाली सुरु असून आमचा त्याला पाठिंबा आहे. मात्र, खोटे कुणबी, वेगैरे ओबीसीत घुसवले आहेत त्यांना वेगळ्या आरक्षणात टाका, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

राज्य सरकारने एक निर्णय घेऊन मराठा आरक्षणावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठका पार पडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमध्ये ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्य सरकारकडून सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं.

ओबीसी आरक्षण फक्त 17 टक्के उरलेलं आहे, या 17 टक्के आरक्षणामध्ये एकूण 400 जातींचा समावेश असून 17 टक्क्यात 54% ओबीसी आणि मराठा समाज बसणार नाही, त्यामुळे आणखीन 10 टक्क्यांनी वाढ करुन मराठा समाजासह पटेल, कापू, जाट समाजालाही आरक्षण द्या म्हणजे सर्वांचाच प्रश्न मिटणार असल्याचं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे.

तसेच भारत सरकारने 50 टक्क्यांचा कॅप ओलांडून 10 टक्के ओपनला वाढवलं आहे. मराठा आरक्षणाबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडली आहे. ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा न येता धक्का मराठा समाजाला कसा न्याय देता येईल? हे बघितलं पाहिजे, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

follow us