मंत्री छगन भुजबळांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या… वाहतुकीचा बट्याबोळ
Ahmednagar : ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी (OBC Maha Elgar Melawa)राज्याचे मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal)हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मात्र नगर शहरात त्यांचे आगमन झाले अन् तोच त्यांच्या ताफ्यातील वाहने एकमेकांवर धडकल्याची घटना घडली. शहरातील डीएसपी चौक ते कोठला दरम्यान चार वाहने एकमेकांना धडकली. दरम्यान यानिमिताने नगर शहरातील वाहतूक शाखेकडून करण्यात आलेली वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. दरम्यान मंत्री भुजबळ यांनी यावेळी गाडीतून उतरुन संबंधित वाहनधारकाची विचारपूस केली.
Eknath Shinde : जखमींना भेटण्यासाठी CM शिंदे रुग्णालयात; म्हणाले, झालेली घटना..
नियोजनाचा बट्ट्याबोळ कशा पद्धतीने उडतो, याचे उदाहरण नगरमध्ये आज पाहायला मिळाले. मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील वाहने ही ज्या वेळेला शहरांमध्ये अचानकपणे आली, त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गाड्या एकमेकांवर धडकल्या गेल्या.
जनतेसाठी भाजप आमदाराने स्वतःच्या घरावर चालवला बुलडोजर
आज एल्गार परिषदेच्या वेळी मंत्री छगन भुजबळ हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. सुरुवातीला ते शासकीय विश्रामगृह येणार होते पण अचानकपणे दौरा बदलल्यामुळे ते नगर शहरातील बुरुडगाव रोडकडे निघाले. त्यांचा ताफा DSP चौकातून कोठला मार्गे निघाला असता, त्याचवेळी अचानकपणे सर्व वाहतूक शाखेची यंत्रणा कोलमडली.
या ठिकाणी असलेल्या चारचाकी गाड्या एकमेकांवर आदळण्याचा प्रकार सुद्धा या ठिकाणी घडला. या ठिकाणी दुचाकीस्वाराला सुद्धा चारचाकीने धडक दिल्याचा प्रकार घडला आहे.
अहमदनगर शहरामधील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर आज (दि. 03) ओबीसींचा (OBC) महाएल्गार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेश निघाल्यानंतर हा पहिला मेळावा अहमदनगरमध्ये होत आहे.
या मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. या मेळाव्यासाठीची संपूर्ण तयारी झाली आहे. या मेळाव्याला दीड ते दोन लाख ओबीसी बांधव उपस्थित राहतील असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे.
या महाएल्गार मेळाव्यात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर , आमदार प्रकाश शेंडगे, कल्याण दळे, लक्ष्मण गायकवाड , शब्बीर अन्सारी, पी.टी चव्हाण , दौलत शितोळे, सत्संग मुंडे, लक्ष्मण हाके या ओबीसी (OBC) नेत्यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.