Girish Mahajan on MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे (Rahul Narvekar) सुरू आहे. या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या कोणत्याही परिस्थितीत नार्वेकर यांना निर्णय द्यावा लागणार आहेत. मात्र निकाल येण्याआधीच राजकीय नेते आणि मंत्र्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 40 गद्दार बाद होतील असे वक्तव्य आमदार आदित्य ठाकरे यांनी केले होते. तर दुसरीकडे शिंदे गटाची बाजू भक्कम आहे. त्यामुळे शिंदे गटालाच न्याय मिळेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी व्यक्त केला. शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला फरक पडणार नाही. अजित पवार यांच्याकडे आमदार आहेत, असेही विधान त्यांनी केले. महाजन यांनी आज नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर मत व्यक्त केले.
Disqualification MLA : लवाद अन् आरोपींची दोनवेळा भेट; उद्धव ठाकरेंनी भेटीचा पुरावाच दाखवला
महाजन पुढे म्हणाले, शेवटी ही न्यायालयीन बाब आहे. विधानसभा अध्यक्ष निकाल देतील. जो निर्णय असेल तो देतील तो सगळ्यांना मान्य असेल. संपूर्ण देशासाठी हा दिशादर्शक असा निकाल असेल. सगळाच पक्ष एका बाजूला आहे. दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार बाहेर पडले म्हणून कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. पण यांच्यात भाजपाचा काहीच संबंध नाही. राष्ट्रवादीतही तसेच झाले आहे. राजकीय पक्षांसाठी हा निर्णय परिणाम करणारा ठरणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काहीच फरक नाही कारण दोन्ही ठिकाणी परिस्थिती सारखीच आहे. अध्यक्षांनी ऐकून घेतले आहे, वकिलांनी म्हणणे मांडले आहे. जर तर असे काही नाही सरकार स्थिर राहील 200 च्या वर आमच्याकडे संख्याबळ आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला फरक पडणार नाही. अजित पवार यांच्याकडे आमदार आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेला काही होणार नाही असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
आमच्याकडे मान सन्मान मिळत होता
त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. एकदिलाने आम्ही काम करत होतो मात्र नंतर सोबत लढलेले असतांना त्यांनी (ठाकरे गट) वेगळी चूल मांडली. त्यांनी केलेल्या कर्मचे फळ आता त्यांना भोगावे लागत आहे. औटघटकेसाठी त्यांनी आम्हाला सोडलं पण त्यांना किंमत होती आता राहिली नाही. आमच्याकडे त्यांना मान सन्मान होता. आता कुठेही शंख वाजवला किंवा बिगुल फुटले तरी काही होणार नाही, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला.
नार्वेकर-शिंदे भेट धक्कादायक, CM शिंदे अपात्र झाले तर पुढं काय? उल्हास बापटांनी नियमच सांगितला