Download App

‘नगर कॉंग्रेसचे नेते रात्रीचे भाजपच्‍या नेत्‍यांचे पायं धरतात’; विखेंची थोरातांवर जळजळीत टीका

Radhakrushna Vikhe On Balasaheb Thorat : नगरचे काँग्रेसचे नेते काँग्रेसमध्ये राहुन रात्रीचे भाजप नेत्यांचे पाय धरत असल्याची जळजळीत टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe patil) यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर केली आहे. दरम्यान, काल लोणावळ्यात झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात बाळासाहेब थोरात यांनी विखे घराण्याचा संपूर्ण इतिहासच बाहेर काढत सडकून टीका केली होती. थोरातांच्या टीकेवर आता राधाकृष्ण विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना विखेंनी बाळासाहेब थोरात यांचं नाव घेण्याचं टाळल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, त्यांचा रोख बाळासाहेब थोरातांवर असल्याचं दिसून आलं.

भाजपसोबत युती करणार का? प्रश्न विचारताच राज म्हणाले माझा विषय वेगळाय….

पुढे बोलताना विखे म्हणाले, लोकसभा निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यात आणि जिल्‍ह्यात कोणी कितीही यात्रा आणि दौरे केले तरी त्‍याचा फारसा परिणाम होणार नाही. राहुल गांधींनी कॉंग्रेस संपवि‍ण्‍याचा संकल्‍प भारत जोडो यात्रेत केला आहे. आताच्या आत्‍ताच्‍या यात्रेत तो संकल्‍प ते सिध्‍दीस नेतील अशी उपरोधिक टीका राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली. तसेच ज्‍यांनी जनाधार गमावला आहे, त्‍यांनी अशा यात्रा काढणे अभिप्रेत आहे. उध्‍दव ठाकरेंचे दौरे आणि राहुल गांधींची यात्रा याचा कोणताही परिणाम महायुतीवर होणार नाही. कारण या दोघांनाही आपण कोणत्‍या दिशेने चाललो आहोत हे माहीत नाही. उध्‍दव ठाकरे केवळ व्‍यक्तिगत गरळ ओकण्‍याचे काम करत आहेत. त्‍यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या विचारांशी केव्‍हाच फारकत घेतली आहे. त्‍यांना जनाधार मिळणार नाही असा दावा मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

इंडिया आघाडीतील पक्षांना घराणेशाहीची चिंता, ठाकरे-पवारांचे उद्दिष्ट फक्त…; अमित शाहांची घणाघाती टीका

माजी मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण यांच्‍या भाजप प्रवेशाचा आनंदच आहे. आमचा आग्रह त्‍यांना खुप पुर्वीपासून होता. कारण कॉग्रेस मध्‍ये आता काहीच शिल्‍लक राहीलेले नाही. राहुल गांधी यांना समाज आणि राजकारणाचा अभ्‍यास नाही. यापुर्वी त्‍यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. त्‍यामध्‍ये कॉंग्रेस संपविण्‍याचा संकल्‍प त्‍यांनी केला होता. आत्‍ताच्‍या यात्रेत तो संकल्‍प ते सिध्‍दीस नेतील असा टोला लगावून जिल्‍ह्यातील नेत्‍यांच्‍या प्रवेशाबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नाला उत्‍तर देताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, कॉंग्रेस मध्‍ये राहुन काही नेते भाजपाच्‍याच नेत्‍यांचे रात्री पाय धरत आहेत.

लोकसभेची उमेदवारी मागण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची गरज नाही. आम्‍ही नेतृत्‍वावर विश्‍वास ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहोत. नेतृत्‍व जो निर्णय घेईल तो आपण मान्‍य करायचा ही आमची भूमिका आहे. कॉंग्रेस नेतृत्‍वहीन झाली असून, तशी अवस्‍था भाजपाची नाही. मागील ५ वर्षात कोणी चागले काम केले याचा विचार करुन, पक्षश्रेष्‍ठी निर्णय घेतील असे विखे पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.

कांदा निर्यात बंदी उठविण्‍याचा निर्णय झाल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. परंतू या निर्णयावर सुप्रीया सुळे यांनी व्‍यक्‍त केलेल्‍या प्रतिक्रीयेला आपण महत्‍व देत नाही. अनेक वर्षे तुमच्‍याकडे केंद्रातील पदं होते. शेतक-यांकरीता कोणते आयात निर्यात धोरण आपण घेतले हे एकदा तरी जाहीर करा. सल्‍ले देणे सोपे असते अंमजबजावणी करणे महत्‍वाचे असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.

follow us