Sanjay Shirsat : गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चांना जोर धरला आहे. शरद पवारांनी पुन्हा एकत्रित येण्याच्या चर्चंना ठामपणे नकार दिला. अशातच आता शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा दावा केला. महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या महिन्याभरात भूकंप होईल, लवकरच शरद पवार गट सत्तेत सहभागी होईल, असं विधान शिरसाट यांनी केलं. त्यामुळं चर्चांना उधाण आलंय.
आरे कॉलनीतील झाडे तोडण्यापूर्वी आमची परवानगी घ्या; SC चे BMC ला कठोर निर्देश
शिवसेनेचा ठाकरे गट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमात पडला आहे, असंही विधान शिरसाट यांनी केले.
संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना शिरसाट यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची महाविकास आघाडीत राहण्याची इच्छा नाही. त्यामुळं त्यांचा पक्ष नेमका कुठं उभा आहे,हे महिन्याभरात दिसून येईल. शरद पवारांची भूमिका दिवसेंदिवस बदलतांना आपण पाहत आहोत. याचा अर्थ असा होतो की, आता त्यांना सत्तेत यायचं आहे. सत्तेशिवाय ते राहू शकत नाही, त्यांचे मन परिवर्तन होऊन ते युतीच्या किंवा अजित पवारांसोबत जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहिल, असं शिरसाट म्हणाले.
‘मी वेळ वाया घालवत नाही, वो तो चलता रहता…’, मेलोनीसोबतच्या व्हायरल मीम्सवर मोदींचे भाष्य
राष्ट्रवादीला भूमिका बदलण्याची सवय आहे. हीच राष्ट्रवादी कधीकाळी काँग्रेसपासून वेगळी झाली होती. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये गेली. ज्यांच्याशी कधी आयुष्यात जमलं नाही, त्या उबाठासोबत त्यांनी युती केली. पहाटेचा शपथविधीही यांनीच केला. भविष्यात यांचा वेध सत्तेच्या दिशेने आहे. लवकरच शरद पवार गट सत्तेत सहभागी होईल, येत्या महिन्याभरात तुम्हाला राष्ट्रवादीचा वेगळा अजेंडा दिसेल, असेही मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीत मुद्दाम मिठाचा खडा टाकणारे पहिले संजय राऊत होते. महाविकास आघाडी आता अस्तित्वात राहणार नाही, असंही ते म्हणाले.
संजय शिरसाट यांनी ठाकरे गटासोबतच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, आता आमच्यात टाळी मारायची वेळ गेली आहे. आता त्यांची वेळ आहे. आम्ही कशासाठी त्यांच्याशी चर्चा करायची ? त्यांना जाणीव होऊ द्या. त्यांनी टाळी देऊ द्या… त्यानंतर आम्ही विचार करू. सध्या संपूर्ण महाराष्ट्र त्यांची सरड्यासारख्या रंग बदलणारी भूमिका पाहत आहे, त्यामुळं त्यांच्या भूमिकेवर कुणीही विश्वास ठेवत नाही. अशी टीकाही शिरसाट यांनी केली.
आम्ही ४० चे ६० आमदार झालो, तर उद्धव ठाकरे गटाचे ५६ पैकी २० आमदार निवडून आले, त्यामुळं भविष्याच्या बोलणाऱ्यांनी स्वतःचं भविष्य पाहावं,असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.
संजय शिरसाट यांनीविजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला. विजय वडेट्टीवार हे सूर्यमुखी आहेत. ते जनता आपली नोकर या आविर्भावात होते. पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली, असंही ते म्हणाले.