Download App

उद्योजकांचे मुंबईतील हेलपाटे थांबवा, परवानगी वेळेत द्या… सामंतांची अधिकाऱ्यांना तंबी

  • Written By: Last Updated:

Uday Samant Letter To Maharashtra Industrial Development Corporation : मागील काही दिवसांपासून उद्योजकांचे मुंबईतील हेलपाटे वाढे आहेत. त्यांना वेळेत परवानगी द्या, अशी तंबी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) अधिकाऱ्यांना दिल्याचं समोर आलंय. उदय सामंत यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (Maharashtra Industrial Department) मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलंय.

शर्वरीचा समुद्रकिनाऱ्यावर टायर फ्लिप वर्कआउट; ‘अल्फा’च्या एक्शन शेड्यूलसाठी तयारी सुरू!

यावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, 4 फेब्रुवारी 2025 रोजी मी प्रधान सचिवांना पत्र दिलंय. मी नाराज आहे, म्हणून पत्र नाही दिलं. मंत्रीपदाचा कार्यकाळ सांगत असताना अपेक्षा काय आहे, हे सांगणं म्हणजे नाराज नाही. प्रशासनाने भावनात्मक निर्णय घ्यावे की नाही घ्यावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण निदान मला कळवणे, हे माझं म्हणणं आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय.

निवेदनात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय की, गेल्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच उद्योग विभागाशी संबंधित काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय स्तरावर घेतल्याचे माझ्या निर्देशनास आलंय. तरी यापुढे मला अवगत करुनच असे निर्णय घेण्यात येतील यांची दक्षता घ्यावी. तसेच महत्वाच्या कामकाजाबाबत आणि सादर होणाऱ्या नस्ती विषयी मला सचिव, उद्योग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी नियमित ब्रिफिंग द्यावी.

Delhi Election : काँग्रेसचे 70 पैकी 67 उमेदवार लाजही वाचवू शकले नाहीत… डिपॉझिट जप्त कधी होते?

यापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाशी संबंधित प्रशासकीय अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन बहुतांश प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार जनतेच्या हिताच्या दृष्टीने संबंधित प्रादेशिक अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले होते. परंतु गेल्या काही काळामध्ये यातील बहुतांश अधिकार केंद्रित करण्यात आले आहेत. असे केल्याने महाराष्ट्रभरातील जनतेला विशेषतः सुक्ष्म आणि लघु उद्योजकांना नाहक मुंबईमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. हा निर्णय का घेण्यात आला आहे, याबाबत कारणीमीमांसा सादर करावी. जनतेच्या कामांना विलंब होवू नये, यासाठी प्रशासकीय गतीमानता आणि इझ ऑफ डुईंग बिझनेसबाबत मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार निर्देश दिले आहेत. तरी या बाबींचा विचार करुन अधिकारांचे विकेंद्रिकरण पुन्हा पूर्ववत करावे.

यापूर्वी महामंडळाने मंजूर केलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये गेल्या काही काळामध्ये माझे निदर्शनास न आणता परस्पर कपात केलीय. उद्योगस्नेही राज्य म्हणून महाराष्ट्रामध्ये गुतंवणूक येण्याच्या दृष्टीने ओद्योगिक क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांचा विकास होणं अत्यावश्यक आहे. तरी मंजूर केलेल्या विकास कामांमध्ये आपल्या स्तरावर परस्पर कपात करण्याचा निर्णय रद्द करुन जरुर तर योग्य त्या निर्णयासाठी माझ्याकडे संचिका सादर करावी, अशी तंबी मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.

 

follow us