Hasan Mushrif : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) एका वर्षापूर्वी राष्ट्रवादीत बंडाळी करत भाजपशी (BJP) हात मिळवणी केली होती. त्यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक आमदार शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे. मात्र, जो मार्ग निवडला त्यावर काटे असो की फुले असतोत, आपण अजितदादांबरोबरच राहणार, असं स्पष्ट भूमिका हसन मुश्रीफांनी घेतली.
संभाजीराजे छत्रपतींवर गुन्हा! पोलिसांचं मौन; संभाजीराजेंनी क्लिअर सांगितलं
हसन मुश्रीफ यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शरद पवार गटात जाणार का, असा सवाल यावेळी त्यांना विचारला असता ते म्हणाले, अजित पवारांच्या नेतृत्वात आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. कारण, 2014 साली भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला होता. त्यानंतर 2017 आणि 2019 ला असेच निर्णय झाल होते. पवार साहेबांनी प्रत्यकवेळी चर्चेसाठी अजित पवारांना पुढं केलं आणि ऐनवेळी नकार देऊन अजितदादांना तोंडघशी पाडलं. मात्र, यावेळी आम्ही प्रमुख 9-10 लोकांनी अजित पवांरासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर आम्ही ठाम आहोत, असं मुश्रीफ म्हणाले.
ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या भावाला अटक, 35 लाखांचे कोकेन जप्त
सारखं इकडं-तिकडं करणं लोकंना आवडत नाही. अजित पवारांबरोबर जाण्याची जी भूमिका घेतल्याने पवार साहेबांकडे जाण्याचा प्रश्नच नाही. या मार्गात काटे असो की, फुले असो आम्ही अजितदादांबरोबर आहोत, असं मुश्रीफ म्हणाले.
एकही आमदार पवार गटात जाणार नाही..
लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटाचा एकच खासदार निवडून आला. त्यामुळं अजितदादा गटाचे आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. रोहित पवार, जयंत पाटीलांनी याबाबत सुचक वक्तव्यही केलं. याविषयी विचारलं असता मुश्रीफ म्हणाले की, आमचा एकही आमदार शरद पवारांकडे जाणार नसल्याचं ते म्हणाले.
यावेळी बोतलाना त्यांनी भाजपला सुनावलं. मला ईडीच्या प्रकरणात अडकवण्यासाठी समरजित घाटगेंनीच प्रयत्न केले होते, भाजपने घाटगेंना दाणे घालता कामा नये, तरच महायुतीची सत्ता येईल. अपक्ष बंडखोरांना पाठिंबा दिला तर सत्तेत अडचणी येऊ शकतात, असा इशारा मुश्रीफांनी दिला.