Aditya Thackeray : काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) नितीशकुमार (Nitish Kumar) आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेऊन तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर वारंवार विरोधकांकडून एनडीएचे सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा केला जात आहे. अशातच आमदार आदित्य ठाकरेंनीही (Aditya Thackeray) मोठं वक्तव्य केलं. काही महिन्यात दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो,असं विधान त्यांनी केलं.
BJP MLA T Raja Singh : मोठी बातमी! भाजप आमदार टी.राजा यांना अटक
आदित्य ठाकरेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला. यावर बोलतांना ते म्हणाले की, उत्तर-पश्चिममधील गडबड आता लोकांसमोर आली. निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आहे. तिथला प्रकार समोर आल्यानंतर अशा उमदेवारांना शपथ दिली तर देशात लोकशाहीचा खून झालाय, हे समजूनच काम करावं लागेल, अशा चिटर लोकांना शपथ कशी देऊ शकता? याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
क्षीरसागर काका-पुतणे एकत्र येणार? रविंद्र क्षीरसागरांची जयदत्त क्षीरसागरांच्या कार्यक्रमाला हजेरी
… तर 40 पारही केलं नसतं
पुढं बोलतांना आदित्य म्हणाले की, राहुल गांधी यांनीही याबाबत ट्विट केले आहे. इलॉन मस्क हे देखील बोलले आहेत. ईव्हीएमचा वापर जगभरात होत नाही. इलॉन मस्क यांचा तंत्रज्ञानावर विश्वास असूनही त्यांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. तुम्ही जर फोनवरून ओटीपीने ईव्हीएम उघडू शकत असाल तर काहीही होऊ शकंत. या निवडणुकीत आम्ही एवढचं म्हणतो की, सीसीटीव्ही फुटेज द्या, पण ते हिंमत करत नाहीत. एवढं सगळं चिटींग करूनही लोकांना त्यांना 240 वर खेचले. जर ईव्हीएम नसते तर 40 पारही केलं नसतं,असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
दिल्लीत वेगळा खेळ होणार…
भारतीय जनता पक्षात ताळमेळ नाही. एकजण 400 पारच्या घोषणेबद्दल बोलतो, तर दुसरं आणखी काही बोलतो. या निवडणुकीत त्यांना लोकांनी जागा दाखवली. आज इंडिया आघाडी 237 तर एनडीए 240 वर आहे. येत्या काही महिन्यांत दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो. मला याची पूर्ण खात्री आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.