Aditya Thackeray : पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री होते, कुठे उभं राहायचं म्हणूनच मी आलो नाही. मुळात माझं मनही नव्हत, अशी टीका आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आजचा सातवा दिवस होता. विधानभवन परिसरात सर्वपक्षीय आमदारांनी फोटोसेशन केलं, मात्र या फोटोसेशनला आदित्य ठाकरेंनी दांडी मारली आहे. त्यावर खुलासा देताना आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे.
Government Schemes : महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा फायदा कोणाला अन् कसा घेता येईल?
आदित्य ठाकरे म्हणाले, फोटोसेशनमध्ये सहभागी व्हायला माझं मन नव्हतं. मी आधीच्या फोटोसेशन मध्ये सहभागी झालो होतो. पण येथे घटनाबाह्य सरकार निर्माण झालं आहे, त्या सरकार मध्ये फोटोसेशन करण्याचा माझं मन नव्हतं. समोरच्या रांगेत सगळे घटनाबाह्य सरकार मधील मंत्री होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी मागच्या रांगेत उभा होतो. कुठे उभं राहायचं म्हणून मी आलो नाही, तर माझं मुळात मन नव्हतं म्हणून मी आजच्या फोटोशेनला आलो नसल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
विधानसभेत भाजप आमदारानं गुणगुणलं रफींचं गाणं; दाद देत फडणवीसांनी दिली ग्वाही
सरकार निवडणुका घ्यायला घाबरतंय…
राज्यात महापालिका, जिल्हा परिषद, लोकसभा निवडणुका घेण्यासाठी सरकार घाबरत आहे. या सरकारने राज्यात लोकशाही मोडीत काढली आहे. अद्यापही पुणे, चंद्रपूर लोकसभा निवडणुका झालेल्या नाहीत. निवडणूक आयोगही निवडणूका घ्यायला तयार नसून कोणतीही निवडणूक सरकार आणि निवडणूक आयोग घ्यायला तयार असल्याचं दिसून येत नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
Wedding Anniversary : अंकिता अन् विकी जैनचा ‘बिग बॉस’च्या घरात साजरा होणार लग्नाचा वाढदिवस
रोजगार नाही म्हणूनच त्यांनी संसदेत उडी मारली…
ससंदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन व्यक्ती पोहचल्या कशा. त्यांना पास देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना रोजगार नाही म्हणूनच जीव धोक्यात घालून उडी मारली आहे. उद्या विधीमंडळातही असं काही झालं आणि आम्ही चर्चेची मागणी केली तर आम्हालाही निलंबित करतील, असंही ते म्हणाले आहेत.