Download App

‘जयंत पाटलांकडून बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम’, अमोल मिटकरींचा बोचरा वार…

जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला, असं म्हणत मिटकरींनी रोहित पाटील यांच्या मुख्य प्रतोदपदाच्या निवडीवरून टीका केली.

  • Written By: Last Updated:

Amol Mitkari : राज्यात महायुती (Mahayuti) सरकार स्थापनेचा घोळ सुरू असतानाच शरद पवार (Sharad Pawar) गटाने विधानसभेतील विविध पदांची निवड केली. त्यानुसार गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तउत्तम जानकर (Uttam Jankar) आणि रोहित पाटलांची (Rohit Patil) मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली. या निवडीवरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खोचक टीका केली.

पुढचे उपोषण आझाद मैदानावर, सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, जरांगेंचा इशारा 

जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला, असं म्हणत मिटकरींनी
रोहित पाटील यांच्या मुख्य प्रतोदपदाच्या निवडीवरून टीका केली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 हून अधिक जागा जिंकल्या. तर मविआचा सपशेल पराभव झाला. शरद पवार गटाने अवघ्या 10 जागा जिंकल्या. निवडणुकीतील या पराभवानंतर शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पाटील आणि उत्तम जानकर यांच्यावर मोठी जबाबादी देण्यात आली. पक्षाच्या गटनेतेपदी आव्हाडांची निवड करण्यात आली. तर तासगाव मतदारसंघातून विधानसभेत पोहोचलेले रोहित पाटील आणि माळशिरस मतदारसंघातून निवडून आलेले उत्तर जानकर यांची मुख्य प्रतोदपदी निवड झाली.

मारकडवाडीतील मतदारांना ईव्हीएमवर शंका, बॅलेट पेपरवर घेणार पुन्हा मतदान, उत्तमराव जानकरांची माहिती… 

या निवडीनंतर अमोल मिटकरींनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, तुतारी गटाच्या मुख्य प्रतोदपदी नवखे तरुण आमदार रोहित आर आर आबांवर जबाबदारी देऊन जयंत पाटील साहेबांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केलाय. शिवाय या नावाच्या वैश्विक ज्ञान पाजळणाऱ्या बालिशला योग्य जागाही दाखवली, असं मिटकरी म्हणाले.

दरम्यान, मिटकरींनी केलेल्या टीकेला आता जयंत पाटील, रोहित पाटील आणि जितेंद्र आव्हाड काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

follow us