पुढचे उपोषण आझाद मैदानावर, सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, जरांगेंचा इशारा

  • Written By: Published:
पुढचे उपोषण आझाद मैदानावर, सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. राज्यात महायुतीला 230 हून अधिक जागा मिळाल्या. आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटी (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी इथून पुढचे सामूहिक आंदोलन आझाद मैदानावर (Azad Maidan) होणार असून सरकार कुणाचे ही असो मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, असा इशारा जरांगेंनी दिला.

मर्कटवाडीतील मतदारांना ईव्हीएमवर शंका, बॅलेट पेपरवर घेणार पुन्हा मतदान, उत्तमराव जानकरांची माहिती… 

विधानसभा निवडणुकीत फॉर्म्युला जुळला नाही, अन्यथा सुपडा साफ केला असता, असंही जरांगे म्हणाले.

जरांगे हे रविवारी अंतरवली सराटी येथून तुळजापूर आणि पंढरपूर येथे दर्शनासाठी निघाले होते. त्यांचा ताफा धाराशिव जिल्ह्यात दाखल होताच सर्वत्र त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षणाची पुढील लढाई सामूहिक आमरण उपोषणाने केली जाईल, कदाचित हे उपोषण मुंबईतील आझाद मैदानावरही होऊ शकते. आता आरक्षणाची ही चळवण थांबणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं.

शिक्रापूरमध्ये हत्येचा थरार! दिवसाढवळ्या शिंदे गटाच्या नेत्याची हत्या, आरोपी फरार… 

पुढं ते म्हणाले की, सरकार कोणाचेही असो, मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, त्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरही आंदोलन करावे लागलं तरी मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आंतरवली सराटीसह प्रत्येक घरात हे उपोषण केलं जाईल, असं जरांगे म्हणाले

मराठा समाजाशिवाय महाराष्ट्रात कोणाचीही सत्ता स्थापन होऊ शकत नाही. यावेळी मराठा समाजाने मोठ्या संख्येने ओबीसी आमदारही निवडून दिल्याचं जरांगे म्हणाले.

जरांगेंनी निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. याबाबत बोलतांना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, फॉर्म्युला जुळून आला नाही. अन्थथा सुपडा साप केला असता.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube