Jitendra Awhad : दीडेक वर्षापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) महायुतीसोबत (Mahayuti) गेले. पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेले, तरीही शरद पवार (Sharad Pawar) हे खचले नाहीत. ते आजही राजकारणात पाय रोवून उभे आहेत. त्यामुळेच अनेक जण पवारांना आपला नेता मानतात. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे देखील शरद पवारांना वडिलासारखे मानतात. आपला नेता मानतात. पण, पवारानंनतर आपला नेता कोण? याबाबत आज आव्हाडांनी भाष्य केलं.
छावा चित्रपटाचा देशभरात धुमाकुळ; तिसऱ्या दिवशी 86 कोटी रुपयांचा टप्पा गाठ सुसाट वेग कायम
शरद पवार यांच्यानंतर मी जयंत पाटील यांना आपला नेता मानतो, असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आज श्री. जयंत राजाराम पाटील म्हणजेच आमचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि प्रगल्भ नेतृत्व यांचा वाढदिवस !
त्यांच्या गुणावर माझे प्रचंड प्रेम आहे. ते म्हणजे तेदेखील माझ्यासारखेच प्रचंड ‘आईवेडे’ आहेत. आजही आई हा शब्द निघाला की त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात.… pic.twitter.com/qHCeLQpd39— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 16, 2025
राष्ट्रवादीतील फुटीनंतर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांसोबत निष्ठेने राहिले. दरम्यान, आज जयंत पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जितेंद्र आव्हाड यांनी खास शैलीत त्याना शुभेच्छा दिल्यात. आव्हाड यांनी एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, आज जयंत राजाराम पाटील म्हणजेच आमचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि प्रगल्भ नेतृत्व यांचा वाढदिवस ! त्यांच्या गुणावर माझे प्रचंड प्रेम आहे. ते म्हणजे तेदेखील माझ्यासारखेच प्रचंड ‘आईवेडे’ आहेत. आजही आई हा शब्द निघाला की त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. कधीही कोणावरही न चिडणारा, सर्वांचे म्हणणे गप्प बसून ऐकणारा , असा राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात विरळाच, असं आव्हाड म्हणाले.
नात्याला काळीमा! हातोड्यानं वार करत आई-वडिलांची केली निर्घृण हत्या, घटनेनंत मुलगा फरार
हसत खेळत लोकांच्या टोप्या उडवणारा. पण, संघटनेतील प्रत्येकाच्या स्वभावाची ओळख असणारा, संघटनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणारा, अर्थात हा भ्रमणाचा गुण त्यांना वडिलांकडून मिळालाय. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी जेव्हा भारत यात्रा केली होती. तेव्हा राजाराम बापू पाटील हे त्यांच्यासोबत सबंध महाराष्ट्र फिरले होते. एका कर्तृत्ववान बापाचा कर्तृत्ववान मुलगा, ही त्यांची ओळख त्यांनी कायम ठेवली. सर्वांशी हसत खेळत वागणारा आणि कोणावरही न चिडणारा नेता सध्या तरी महाराष्ट्रात नाही. त्यांचा स्वभावगुण पाहता महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची धमक असलेले ते नेतृत्व आहे. पण, नशिबाने अजून तरी साथ दिलेली नाही. पण, ते नशिब आज ना उद्या उघडेल, याची मला खात्री आहे, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला.
या माझ्या आवडत्या नेत्याला , ज्यांना मी आदरणीय शरद पवार साहेब यांच्यानंतर आपला नेता मानतो, अशा जयंत पाटलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !, अशा शब्दात आव्हाडांनी सदिच्छा व्यक्त केल्या.