पुन्हा राष्ट्रवादी VS राष्ट्रवादी! ‘काका विरुद्ध पुतण्या’ अन् ‘वडिल विरूद्ध मुलगी’; ‘या’ मतदारसंघांत होणार अटीतटीचा सामना

पुन्हा राष्ट्रवादी VS राष्ट्रवादी!  ‘काका विरुद्ध पुतण्या’ अन् ‘वडिल विरूद्ध मुलगी’; ‘या’ मतदारसंघांत होणार अटीतटीचा सामना

Ajit Pawar vs Sharad Pawar : यंदा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत होणार असल्याचं दिसतंय. राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना विरूद्ध शिवसेना अन् राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. जवळपास 26 मतदारसंघात आतापर्यंत 13 ठिकाणी उद्धव ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट आणि 13 ठिकाणी अजित पवार (Ajit Pawar) गट विरूद्ध शरद पवार (Sharad Pawar) गट अशी उमेदवारांची घोषणा झालीय.

राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी

शरद पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्याविरुद्ध युगेंद्र पवार यांना रिंगणात उतरवलं आहे. अहेरीमधून धर्माराव अत्राम (अजित पवार गट) विरूद्ध भाग्यश्री आत्राम (शरद पवार गट), इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे (अजित पवार गट) विरूद्ध हर्षवर्धन पाटील (शरद पवार गट), कागलमध्ये
हसन मुश्रीफ (अजित पवार गट) विरूद्ध समरजित घाटगे (शरद पवार गट), आंबेगावमध्ये दिलीप वळसे (अजित पवार गट) विरूद्ध देवदत्त निकम (शरद पवार गट) मुंब्र्यामध्ये नजीब मुल्ला (अजित पवार गट) (Maharshtra Assembly Election 2024) विरूद्ध जितेंद्र आव्हाड (शरद पवार गट), वडगाव शेरीत सुनील टिंगरे (अजित पवार गट) विरूद्ध बापूसाहेब पठारे (शरद पवार गट), वसमतमध्ये चंद्रकांत नवघरे (अजित पवार गट) विरूद्ध जयप्रकाश दांडेगावकर (शरद पवार गट), हडपसरमध्ये चेतन तुपे (अजित पवार गट) विरूद्ध प्रशांत जगताप (शरद पवार गट), चिपळूणमध्ये शेखर निकम (अजित पवार गट) विरूद्ध प्रशांत यादव (शरद पवार गट), कोपरगावमध्ये आशुतोष काळे (अजित पवार गट) विरूद्ध संदीप वर्पे (शरद पवार गट), उदगीरमध्ये संजय बनसोडे (अजित पवार गट) विरूद्ध सुधाकर भालेराव (शरद पवार गट) आणि तासगाव विधानसभा मतदारसंघात संजयकाका पाटील (अजित पवार गट) विरूद्ध रोहित पाटील (शरद पवार गट) असा संघर्ष होणार आहे.

…अन्यथा आम्ही महाविकास आघाडीचा प्रचार करणार, आठवलेंच्या कार्यकर्त्यांचा महायुतीला थेट इशारा

11 नवीन चेहऱ्यांना संधी

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काल त्यांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या यादीत शरद पवारांनी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचं दिसतंय. पवारांनी एकूण 11 नवीन चेहऱ्यांना तिकीट दिलंय. यामध्ये राणी लंके, प्रशांत जगताप, महेबूब शेख, युगेंद्र पवार, रोहित पाटील हे चेहरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. शरद पवारांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकूण 45 नावांचा समावेश आहे. यातील 11 उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरत आहे.

घड्याळाचे काटे फिरले! अजितदादांचा काँग्रेससह भाजपला धक्का, दोन माजी खासदारांसह आमदारही पक्षात

जामनेर विधानसभेमधून दिलीप खोडपे, मूर्तीजापूरमधून सम्राट डोंगरदिवे, अहेरीतून भाग्यश्री आत्राम, मुरबाडमधून सुभाष पवार, युगेंद्र पवार बारामती विधानसभेतून तर कोपरगावमध्ये संदीप वर्पे, पारनेर विधानसभेमधून राणी लंके, आष्टीतून मेहबूब शेख, चिपळूनमध्ये प्रशांत यादव, तासगाव -कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटील, हडपसर मतदारसंघात प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आलीय. अहेरी विधानसभेतून आग्यश्री आत्राम आणि पारनेर विधानसभा राणी लंके या दोन महिलांना संधी देण्यात आलीय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube