Download App

ठाकरेंना ‘शिवसेना’ नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही, रामदास कदमांनी पुन्हा डिवचलं…

उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव घेण्याचा नैतिक अधिकार नसून हा अधिकार फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम आणि शिवसैनिकांना असल्याचं म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे दोन दिवसांसाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ठाकरेंकडून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. त्यावरुन रामदास कदमांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंसह कुटुंबियांवरही निशाणा साधला आहे.

ठाकरे विरुद्ध राणा : “परत निवडणुका लढवायच्या आहेत हे लक्षात ठेवा…” संजय राऊतांचा दाम्पत्याला इशारा

रामदास कदम म्हणाले, निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षाचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार नसून तो अधिकार फक्त निष्ठावान शिवसैनिकांना असल्याचा टोला लगावला आहे. तसेच ज्या दिवशी ठाकरे शरद पवारांच्या मांडीवर आणि सोनिया गांधींचे तळवे चाटले त्या दिवशी त्यांनी शिवसेना नाव घेण्याचा अधिकार गमावला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

भाजप नेत्याच्या नावाने फेक अकाऊंट, महिलांना विचारायचा भेटू शकता का? पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडायचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. आम्ही पक्षात असताना उद्धव ठाकरे यांनी हुकुमशाही केली होती, आता ते हिटलर झाले आहेत, त्यामुळे आता ते शिवसेनेतून सगळ्यांना हटवणार असून एक दिवस बाप, बेटे, पत्नी देश सोडून निघून जाणार असल्याचं भाकीतंही त्यांनी उद्धव ठाकरेंविषयी केलं आहे.

उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर! संजय राठोडांच्या बालेकिल्ल्यातून धडाडणार तोफ

तसेच बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी शिवसेनेची स्पष्ट भूमिका ही हिंदुत्व होती. जेव्हा काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल तेव्हा मी माझं शिवसेनेचं दुकान बंद करणार असल्याचं बाळासाहेब ठाकरेंनी ठामपणे सांगितलं होतं, पण उद्धव ठाकरेंनी आपल्या वडिलांच्या विचारांशी बेईमानी करीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

सु्प्रिया सुळेंना लोकसभेचा पेपर अवघड जाणार? अजितदादांना हाताशी घेत भाजपने आखली रणनीती

सध्या उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरु असून त्यांच्या या दौऱ्यावरही कदमांनी भाष्य करीत सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालंय. ते म्हणाले, उद्धव ठाकरे सध्या दौऱ्यात उसनं आवसान आणून बोलत आहेत. त्यांच्या बाजूने निकाल दिला तर चांगला आणि आमच्या बाजूने निकाल लागला तर सगळेच बेईमान असंही ते म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या फुटीवरही कदमांनी यावेळी बोलताना बोट ठेवलंय. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सत्तेत आले आहेत. आता तुमचे खोके आणि गद्दार शब्द कुठे गेले? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी कितीही दौरे केले तरी त्यांच्यावर आता जनतेचा विश्वास नसून पुढील काळात जनता त्यांना योग्य ती जागा दाखवणार असल्याचंही रामदास कदम म्हणाले आहेत.

Tags

follow us