…तर चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी करणार, शिक्षण व्यवस्थेची पोलखोल करीत रोहित पवार आक्रमक

खोट्या पदवी प्रकरणी पुढील 10 दिवसांत उत्तर न दिल्यास चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचं आमदार रोहित पवारांनी स्पष्ट केलंय.

Untitle (2)

Untitle (2)

Mla Rohit Pawar : बोगस मार्कशीट, खोट्या पदवी प्रकरणी पुढील 10 दिवसांत उत्तर न दिल्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचा आक्रमक पवित्रा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी घेतला आहे. पुण्यात बोगस मार्कशीट, खोट्या डिग्री देण्याचा प्रकार उघड झाला असल्याचा दावा करीत पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, यूनिवर्सिटीकडून खोट्या डिग्री देणे योग्य नाही. यूनिवर्सिटीकडून मोठी चूक झाली असून विद्यापीठातील वित्त आणि सेवा विभागातील अधिकारी रमेश मुखेकरवर कारवाई करण्यात आली परंतू हे प्रकरण इथेच संपत नाही. या प्रकरणात कोण कोण आहे? हे तपासलं पाहिजे. हे रॅकेट खोलवर आहे. भाजपच्या विचाराच्या काही लोकं असण्याची शक्यता आहे.
भाजपचे पदाधिकारी राजेश पांडे नावाच्या व्यक्तीचा यांचा वावर विद्यापीठात असतो, असा थेट आरोप आमदार पवार यांनी केला आहे.

तसेच या प्रकरणी फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे. या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, यास जबाबदार कोण? चंद्रकांत पाटलांना जबाबदार का धरू नये?
पुढील १०-१२ दिवसात काय तपास झाला? माहिती द्यावी लागणार आहे. एक प्राध्यपक भरण्यासाठी एक कोटी घेतले जात आहेत. तोंड पाहून प्राध्यापकांची भरती केली जात असल्याचाही आरोप यावेळी आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

फ्रान्समध्ये इन्फोसिसला मोठा दणका; कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांच्या नोंदीतील त्रुटींमुळे 2 कोटींचा दंड

दरम्यान, पुण्यात एका रिक्षाचालकास तीन लाख रुपयांत पदवी प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका रिक्षा चालकाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बनावट डिग्री मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी, महेश कदम नावाच्या या रिक्षाचालकाने विद्यापीठातील वित्त आणि सेवा विभागातील अधिकारी रमेश मुखेकर याच्याशी संपर्क साधला होता असा दावा केलाय. महेश मुखेकरने तीन लाख रुपयांच्या बदल्यात आपल्या मुलाला बी. कॉमचे बनावट पदवी प्रमाणपत्र देण्याचं कबूल केलं होतं.

दीड लाख रुपयांवरच हा व्यवहार ठरला होता असा रिक्षाचालक महेश कदम यांचा दावा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने मात्र विद्यापीठातील कोणी कर्मचारी बनावट डिग्री प्रकरणांत सहभागी आहे का याची चौकशी केली जात असल्याच म्हटलं. त्यामुळे, अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र, या घटनेनं आता पुणे विद्यापाठातील बोगस प्रमाणपत्राचा विषय चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावरही आमदार पवारांची पोस्ट…
‘पुरावेच लागतात ना? अंधभक्तांनो घ्या आता पुरावे..! पेपर फोडायचा, प्रवेश मिळवायचा आणि तीन चार वर्षात डिग्री, एवढी उठाठेव कशाला? महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते. उच्च शिक्षणमंत्री आता तरी झोपेतून उठा…! फडणवीस साहेब मानले राव तुमच्या सरकारच्या कारभाराला.!’ अशा आशयाची पोस्ट करत रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे.

Exit mobile version