अहमदनगर : आज झालेल्या ग्रामपंचायत मतमोजणीत आमदार शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. कांगोणी, भेंडे खुर्द व वडाळ्यात सत्तांतर झाले आहे. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाच्या ताब्यात असलेल्या कांगोणीत गडाख गटाचा सरपंच निवडून आला आहे. येथे ११ पैकी ८ सदस्य मुरकुटे गटाचे निवडून आले आहेत. तर भेंडा येथे घुले + गडाख गटाचा सरपंच निवडून आला.
विजयी सरपंच यांची नावे पुढीलप्रमाणे
१) कांगोणी- रोहिणी सोमनाथ कराळे
२) वडाळा- ललित पांडुरंग मोटे
३) अंमळनेर- ज्ञानेश्वर काशीनाथ आयनर
४) माका- विजया बाबासाहेब पटेकर
५) हंडीनिमगाव- पुजा भिवाजी आघाव
६) माळीचिंचोरा- राजेंद्र देवराम अहिरे
७) गोधेगाव- बेबी जालिंदर नरोडे
८) भेंडा खुर्द- वर्षा वैभव नवले
बिनविरोध निवड झालेले सरपंच
१) चिंचबन- मीनाक्षी काकडे
२) सुरेशनगर- शैला उभेदळ
३) हिंगोणी- रुपाली खंडागळे
४) खुपटी -दत्तात्रेय वरुडे
५) शिरेगाव-निरंतर तुवर