Sunil Shelke : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंवर (Sunil Shelke) गंभीर आरोप केले आहेत. सुनील शेळकेंनी उत्खनन क्षेत्रातील हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप राऊतांनी केला. तसेच शेळकेंवर कारवाई करून महाराष्ट्राची लूट थांबवावी अशी मागणी राऊतांनी केली. या आरोपांवर आता सुनील शेळकेंनी भाष्य केलं. संजय राऊतांनी यासंबंधीचे पुरावे दिले तर मी त्यावर खुलासा करेन, असं ते म्हणाले.
तूप, साबण आणि स्नॅक्स होणार स्वस्त? जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दरात मोठ्या कपातीची शक्यता
कोणताही पुरावा नसताना आरोप
आमदार सुनील शेळके यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राऊतांच्या आऱोपाविषयी विचारले असता ते म्हणाले की,संजय राऊत यांनी माझ्यावर कोणताही पुरावा नसताना आरोप केले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे माहिती असेल, काही पुरावे असतील किंवा मला यासंबंधीच्या शासकीय नोटीसा आल्या असतील, माझी चौकशी चालू असेल तर त्यांचे पुरावे सादर करावेत. जोवर ते पुरावे सादर करणार नाहीत, तोवर मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. कुठलाही खुलासा करणार नाही, असं शेळके म्हणाले.
तर आरोप करणं हा राऊतांचा नेहमीचा उद्योग असल्याचं विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी म्हणाले.
अखेर बिंग फुटलं..विद्यार्थ्याला सतत 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जायची, शिक्षिकेचं धक्कादायक प्रकरण उघड
राऊत काय म्हणाले?
सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्या पक्षांचे आमदार आणि खासदार महाराष्ट्राला लुटत आहेत आणि फडणवीसांचे याकडे लक्ष नाही. आमदार सुनील शेळकेंनी हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी लुटली आहे. हे खूप गंभीर प्रकरण आहे. एमआयडीसीच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे खाण उद्योग सुरू करून त्यांनी सरकारची हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी बुडवली आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल सविस्तर तपशील पाठवला. त्यासोबत पुरावेही जोडले आहेत, असं राऊत म्हणाले.
ते म्हणाले, आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांच्या भ्रष्टाचाराचे २१ खटले पुराव्यांसह पाठवले आहेत. मात्र, फडणवीसांनी आजपर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा मी त्यावर कारवाई करेन, असंही सांगितलं नाही.