तूप, साबण आणि स्नॅक्स होणार स्वस्त? जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दरात मोठ्या कपातीची शक्यता

Lowering Tax Rate On Common Household Items : येत्या काही दिवसांत तूप, साबण, स्नॅक्ससारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंचे (Lowering Tax Rate) दर मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) स्लॅब पुनर्रचनेचा गंभीरपणे विचार सुरू केला आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंवरील 12% जीएसटी स्लॅब 5% वर आणण्याचा किंवा 12% स्लॅबच रद्द करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे, अशी माहिती समोर येत आहे.
सध्या 12% कर लागू असलेल्या अनेक वस्तू या मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटांसाठी अत्यावश्यक आहेत. या स्लॅबमध्ये तूप, विविध प्रकारचे स्नॅक्स, साबण, टूथपेस्ट, डिटर्जंट आणि काही डबाबंद अन्नपदार्थांचा (Ghee Soap And Snacks) समावेश आहे. या दरकपातीनंतर ग्राहकांना हे सर्व उत्पादने अधिक स्वस्त दरात मिळण्याची शक्यता आहे.
दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण, थेट इशारा देत ड्रॅगन संतापला, म्हणाला जर आमच्या मान्यतेशिवाय…
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अंतिम निर्णय?
GST दरवाढीवरील निर्णय GST कौन्सिल घेणार आहे. पुढील 56वी बैठक या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. परंपरेनुसार अशा बैठकीसाठी 15 दिवस आधी सूचना द्यावी लागते. मात्र, आतापर्यंत अद्याप अधिकृत तारखांची घोषणा झालेली नाही. ही बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत सर्व राज्यांचे अर्थमंत्री या कौन्सिलचे सदस्य आहेत.
Video : “शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करू नका, गोंधळ घालू नका”, अजितदादांनी विरोधकांना खडसावलं
निवडणूकपूर्व रणनीतीचा भाग?
ही जीएसटी कपात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची चाल ठरू शकते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा देणे ही सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करून मध्यमवर्गीय अन् गरीब वर्गावरचा आर्थिक भार हलका करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते. जर हा प्रस्ताव मान्य झाला, तर 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर कर रचनेत झालेला हा सर्वात महत्त्वाचा बदल ठरेल. यामुळे केवळ ग्राहकांना फायदा होणार नाही, तर बाजारातील मागणीही वाढण्याची शक्यता आहे.
पुढे काय होणार?
– GST कौन्सिल बैठकीत निर्णय अपेक्षित
– जीवनावश्यक वस्तूंवरील 12% स्लॅब 5% पर्यंत आणण्याचा विचार
– पर्यायी रूपात 12% स्लॅब पूर्णतः काढण्याचाही पर्याय
– दरकपातीनंतर तूप, साबण, स्नॅक्ससारख्या वस्तू होतील स्वस्त
– सामान्य ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा
महागाईच्या काळात सामान्य ग्राहकांसाठी ही बातमी दिलासादायक ठरू शकते. आता संपूर्ण लक्ष GST कौन्सिलच्या बैठकीकडे लागले आहे.