रेड 2 ने 100 कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी – वाणी कपूर

Vaani Kapoor Grateful For Raid 2 : ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ (Raid 2) चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने भारतीय बॉक्स ऑफिसवर अधिकृतपणे 100 कोटींचा आकडा पार केला आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा चित्रपटाच्या (Bollywood Movie) प्रभावशाली कथानकाला आणि देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीला अधोरेखित करतो.
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अजय देवगणच्या समोर झळकलेली अभिनेत्री वाणी कपूरने प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आणि चित्रपटाच्या यशाबद्दल (Entertainment News) आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली.
प्रवाशांना मोठा दिलासा! भारत-पाक युद्धबंदीनंतर 32 विमानतळं पुन्हा सुरू; नोटम जारी
वाणी कपूर म्हणाली, रेड 2 ने 100 कोटींचा टप्पा पार केला आणि एक ब्लॉकबस्टर म्हणून साजरा केला जात आहे, यासाठी मी अत्यंत आभारी आहे. या लोकप्रिय फ्रँचायझीचा भाग होणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्या अभिनयाला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल मी नम्रपणे कृतज्ञता व्यक्त करते. एक अभिनेत्री म्हणून, मी विविध प्रकारचे भूमिकांमध्ये काम करण्याचा आणि प्रत्येक प्रकल्पातून शिकण्याचा प्रयत्न करते. प्रेक्षकांकडून मिळणारा असा प्रतिसाद खूपच प्रेरणादायक आणि समाधान देणारा असतो. ‘रेड 2’च्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करते. देशभरातून मिळणारे प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी खूप खास आहे.
ब्रेकिंग : प्रतिक्षा संपली, धाकधूक वाढली; उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल
या मैलाचा दगड गाठून, ‘रेड 2’ने आपली यशस्वी घौडदौड कायम ठेवली असून, वर्षातील एक प्रमुख हिट म्हणून आपली जागा पक्की केली आहे, असं वाणी कपूरने म्हटलंय. तर रेड 2 चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे, असं वाणी कपूर यांनी म्हटलंय.