Income Tax Raid : अबू आझमींकडे घबाड सापडले ! 142 कोटींची बेनामी संपत्ती जप्त
Income Tax Raid on Samajwadi party leader Abu Azmi : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख व आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांच्याविरोधात आयकर विभागाने (Income Tax) कारवाई केली आहे. अबू आझमीच्या संबंधित विनायक निर्माणवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. वाराणसी, दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी ही छापेमारी झाली आहे. तीन दिवसांच्या चौकशीत काही बांधकाम व्यावसायिक यांच्याबरोबर झालेले व्यवहार जमीन खरेदी-विक्रीबाबतचे कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती लागली आहेत. त्यात 142 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती (Benami Property)आढळून आली आहे. ही संपत्ती करण्यात आली आहे. कर लपविल्याप्रकरणी ही कारवाई झाली असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
ही कोणती संस्कृती? वडील, विठ्ठल म्हणायचे आणि वयाच्या 83 व्या वर्षी घरातून बाहेर काढायचे?
अबू आझमीच्या संपत्तीबाबत गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभाग चौकशी करत होते. शनिवारी ही चौकशी थांबविण्यात आलेली आहे. आयकर विभागाच्या पथकाने वाराणसीमधील बाबतपूर एअरपोर्टजवळील किंमती जमिन, बेकायदेशीर फर्म, प्लॅट, जमिनींचे कागदपत्रे आयकर विभागाने जप्त केले आहे. आयकर विभागाच्या लखनऊ येथील पथकाने अबु आझमीच्या संबंधीत बांधकाम व्यावसायिकांची कागदपत्रेही जप्त केली आहे. त्यात 142 कोटींहून अधिक बेनामी संपत्ती आढळून आली आहे.
Kangana Ranaut: ‘आताच सुधरा नाहीतर…’; महादेव बेटिंग ॲप प्रकरणात कंगनाची उडी
मलदहिया येथील विनायक प्लाजा आणि आझमगड येथील अबू आझमींच्या संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली आहे. अबू आझमीकडे रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. लखनऊचे आयकर विभागाचे प्रमुख डी. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील चार पथकाने ही कारवाई केलेली आहे.
पाच वर्षांत तिसरी कारवाई
अबु आझमी यांनी मोठ्या प्रमाणात रिअर इस्टेटमध्ये गुंतवणूक केलेली आहे. कर चुकवेगिरीप्रकरणी तिसऱ्यांदा अबु आझमींवर कारवाई झालेली आहे. नोएडा, लखनऊ आणि वाराणसी येथे तिसऱ्यांदा आयकर विभागाने छापेमारी केली आहे. अबु आझमीची मुंबईमध्ये मोठी संपत्ती आहे. मुंबईमध्ये बांधकाम व्यवसाय आहे.
कुठे कारवाई ?
वाराणसी येथील पाच मजली कर्मशियल टॉवर
45 प्लॅटचे रेसिडेन्शिअल टॉवर
विनायक निर्माणचे दहा कोटींचे बँक अकाउंट सील