Kangana Ranaut: ‘आताच सुधरा नाहीतर…’; महादेव बेटिंग ॲप प्रकरणात कंगनाची उडी

Kangana Ranaut: ‘आताच सुधरा नाहीतर…’; महादेव बेटिंग ॲप प्रकरणात कंगनाची उडी

ED Raid On Production House: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात (Mahadev App Case) अनेक बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे समोर येत आहे. बाॅलिवूडचे अनेक कलाकार सध्या ईडीच्या (ED) रडारवर आहेत. इतकेच कलाकारांनंतर आता मुंबईतील एका प्रोडक्शन हाऊस देखील ईडीने छापेमारी केली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ईडीने याप्रकरणात मुंबई येथील कुरेशी प्रॉडक्शन (Production House) हाऊसच्या ५ कार्यालयावर छापेमारी केली. यावर आता अभिनेत्री कंगनाने हल्लाबोल केला आहे.

Kangana Ranaut

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात सोनाक्षी सिन्हा, रणबीर कपूर, मलायका अरोरा, सोनू सूद, सुनील शेट्टी, हार्डी संधू, रश्मिका मंदाना, सारा अली खान, टायगर श्रॉफ, एम्सी दिप्ती साधवानी, गुरु रंधावा, श्रद्धा कपूर, हुमा कुरेशी, कपिल शर्मा यांची नाव समोर आले आहेत. आता रणबीर कपूर याच्यानंतर यांची देखील सखोल चाैकशी ही ईडीकडून करणार असल्याची दाट शक्यता आहे.

आता या प्रकरणात कंगनाने उडी मारली आहे. कंगनाने थेट बाॅलिवूडच्या या कलाकारांवर जोरदार निशाणा साधला. कंगनाचे बोलणे ऐकून चाहते देखील हैराण झाल्याचे देखील पाहायला मिळत असते. या महादेव बेटिंग ॲपमुळे आता मनोरंजन कलाकारांची झोप उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

Prasad Oak: ‘गळ्यात हार अन् डोक्यावर फेटा’, प्रसाद ओकसोबत नेमकं काय घडलं?

कंगनाने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, हे लोक एका वर्षामध्ये सुमारे 6 वेळा माझ्याकडे आले होते. प्रत्येक वेळी त्यांनी मला विकत घेण्याच्या एकापेक्षा एक ऑफर केल्या आणि ते मला कोट्यवधी रुपये देण्याची भाषा करत होते. परंतु मी प्रत्येक वेळी त्यांना नाही म्हणाले. प्रामाणिकपणा आता फक्त तुमच्या विवेकासाठी उपयुक्त नाही. हा नवा भारत आहे, स्वतःला सुधारा नाही तर सुधारले जाणार आहेत. तसेच तिने तिच्या पोस्टमध्ये एक फोटो देखील शेअर केला आहे. आता कंगनाने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे बघायला मिळत आहे. लोक सध्या कंगनाच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube